Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.
नमस्कार मित्रांनो, आज आपण 'Magel Tyala Saur Krushi Pump yojana' मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. नेमकी ही योजना
कोणासाठी असणार आहे, यासाठी कोण पात्र असणार आहे तसेच ज्या पात्र शेतकऱ्यास या
योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो, त्यासाठी आवश्यक
कागदपत्रे काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
Magel tyala saur krushi pump yojana
योजनेची वैशिष्ट्ये:
या योजनेअंतर्गत
सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना देखील लाभ घेता येतो. यामध्ये
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १०% टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल
म्हणजेच 90% अनुदान भेटणार आहे.
त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 5 टक्के हिस्सा फक्त
भरायचा आहे म्हणजेच 95 टक्के अनुदान राज्य तसेच
केंद्र शासनामार्फत मिळणार आहेत मिळणार आहे.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
यामध्ये जमिनीच्या
क्षेत्रानुसार त्या क्षमतेचा सौर पंप मिळणार आहे म्हणजेच ३ एचपी ते ७.५ एचपी
इतक्या क्षमतेपर्यंत चा सोलर पंप मिळणार आहे. त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर
शेतकऱ्यांना लोड शेडिंग त्याचप्रमाणे वीज बिल भरण्याची चिंता राहणार नाही. ही योजना
स्वतंत्र त्याचप्रमाणे शाश्वत गटासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. तसेच ही योजना
विम्यासह मिळणार आहे.
निकष:
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अडीच एकर पर्यंत जमीन असणार आहे त्या शेतकऱ्यांना तीन एचपी चे सौर कृषी पंप मिळतील त्याचप्रमाणे अडीच एकर ते पाच एकर पर्यंतचे जे शेतकरी असणार आहे या शेतकऱ्यांना पाच एचपी इतक्या क्षमतेचा सौर पंप मिळू शकेल व पाच एकर पेक्षा ज्या शेतकऱ्यांना जास्त जमीन असेल असे शेतकरी साडेसात एचपी इतक्या क्षमतेचे कृषी पंप मिळण्यास पात्र असतील. "Magel Tyala Saur Krushi Pump Yojana"
या योजनेचा लाभ
घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर बोरवेल, तलाव किंवा नद्या, नाल्या शेतीच्या जवळ असणे
आवश्यक आहे. यासाठी महावितरण सदर शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का याची
चौकशी करेल.
ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर
कृषी पंप योजना एक व दोन तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेतला नाही
ते शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सौर कृषी पंपाचे फायदे:
1) सौर कृषी पंपाचा
महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्रामीण भागात लोडशेडींग भरपूर प्रमाणात असते त्यामुळे
शेतकऱ्यांना शेतीला रात्रीचे पाणी द्यावे लागते परंतु, सौर पंपामुळे आपल्या
सोयीनुसार शेतीला पाणी देता येईल.शेतकऱ्यांना लोड शेडिंग सारख्या गोष्टींचा त्रास
होणार नाही.
2) याचा देखभाल खर्च कमी
प्रमाणत आहे, डिझेल इंजिन ला लागणाऱ्या
इंधनापेक्षा हा पंप परवडतो तसेच अनेक वर्ष टिकतो.
3) कमी दाबाने वीज पुरवठा,
मोटर बिघडणे, ट्रान्सफॉर्मर बिघाड अशा त्रासापासून मुक्तता.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
4) राज्यात अनेक ठिकाणी
दुर्गम,अतिदुर्गम भाग आहेत की
ज्याठिकाणी विजेचे खांब देखील नेणे अवघड असते.अशा ठिकाणी सौर कृषी पंप अत्यंत
फायदेशीर ठरतो.
5) पर्यावरणाच्या समतोल
योग्य प्रकारे राखला जाऊ शकतो.
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे मात्र
कृषी पंपासाठी वीजपुरवठा उपलब्ध नाही अशा सर्व प्रकारच्या शेतकरी या योजनेचा लाभ
घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) जातीचा दाखला ( अनुसूचित
जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी)
3) ७/१२ उतारा ( जलस्त्रोत
नोंद आवश्यक)
4) सात बाऱ्यावर इतर
हिस्सेदार असतील तर त्यांचे ना हरकत आवश्यक.(stamp पेपर वर)
5) भूजल सर्वेक्षण विभागाचा ना हरकत दाखला ( डार्क झोन असल्यास)
6) मोबाईल क्रमांक.
७) पासपोर्ट आकाराचा
फोटो.
८) बँक पासबुक. इत्यादि
सदर सौर कृषी पंप
नादुरस्त किव्वा काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित
एजन्सी ची 5 वर्ष विनामूल्य असणार
आहे.त्यासाठी महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करावा लागणार आहे.
योजेअंतर्गत बसवलेला सौर
कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे,त्याची विक्री करणे गुन्हा समजला जाईल व महावितरण मार्फत
गुन्हा दाखल केला जाईल.
अर्ज करण्याची पद्धत:
सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.त्यासाठी शेतकरी बांधवांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रा मध्ये जावे किव्वा mahadiscom या महावितरण च्या तयार करण्यात आलेल्या नवीन वेबसाईट वर जावे.त्यांनतर A-1 form भरावा व सर्व माहिती वेबसाईट वर व्यवस्थित भरून कागदपत्रे uplod करावीत.
Form submit केल्यानंतर एक
लाभार्थी क्रमांक प्राप्त होईल हा क्रमांक जाऊन ठेवावा जेणेकरून वेळोवेळी अर्जाची
सद्यस्थिती पाहता येईल.
जे शेतकरी पात्र होतील त्यांना 5% किव्वा 10% रक्कम भरावी लागेल त्यांनतर सर्व संच संबंधित शेतकऱ्यास प्राप्त होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी