SBIF Asha Scholarship Program 2024: मिळवा 7.5 लाखापर्यंत शिष्यवृत्ती
SBIF Asha Scholarship Program 2024:
नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील
एक नामांकित बँक आहे. बँकिंग क्षेत्राच्या
पलीकडे देखील या बँकेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात जसे की समाजातील वंचित घटक
सुधारण्यासाठी योगदान देणे, आरोग्यसेवा, क्रीडा सेवा त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील या
बँकेअंतर्गत महत्त्वपूर्ण असे उपक्रम राबविले जातात. SBIF Asha Scholarship Program 2024 या उपक्रमाविषयी आज आपण
सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करूयात.
एसबीआय बँक 'एसबीआय
फाउंडेशन' साठी सी एस आर फंड उपलब्ध करून देते हे फाउंडेशन भारतातील 28 पेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत असून
यामध्ये अनेक योजना राबविल्या जातात. आज आपण शैक्षणिक
योजना व त्यासाठी दिली जाणारी स्कॉलरशिप याविषयी माहिती पाहत आहोत.
ही स्कॉलरशिप अगदी
सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते आयआयएम च्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्कॉलरशिप अंतर्गत 7.5 लाखांपर्यंत
स्कॉलरशिप दिली जाते यामध्ये प्रामुख्याने पाच प्रकार केलेले आहे ते खालील
प्रमाणे.
SBIF Asha Scholarship Program 2024
1) SBIF Asha Scholarship Program For School Students( शालेय विद्यार्थ्यांसाठी ची स्कॉलरशिप):
पात्रता:
1) अर्जदार विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
2) अर्ज करणारा
विद्यार्थी हा इयत्ता 6 ते 12 या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण घेत असावा.
3) सदर
विद्यार्थ्याला मागील वर्षांमध्ये 75 टक्के मार्क मिळवणे अपेक्षित आहे.
4) त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख च्या आत मध्ये असावे.
आवश्यक कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) पासपोर्ट साईज
फोटो
3) उत्पन्नाचा दाखला
4) मागील वर्षाचे
मार्कशीट
5) चालू वर्षात प्रवेश घेतलेली पावती SBIF Asha Scholarship Program 2024
6) चालू वर्षातील
प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळेतील ओळखपत्र यापैकी एक
7) स्वतः विद्यार्थी
किंवा पालकांचा बँकेचा तपशील.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज प्रकिया ही ऑनलाईन
स्वरूपाची असेल त्यासाठी आपणास buddy4study या website वर जावे लागेल.
पुढे आपणास registar
व apply now हे दोन पर्याय दिसतील.जर आपण पाहिले आपले खाते बनविले असेल
तर डायरेक्ट apply करू शकता किव्वा
रजिस्टर वर क्लिक करुन आपले नाव,ईमेल आयडी,मोबाईल क्रमांक,टाकून पासवर्ड तयार करावा.
एकदा आपले खाते तयार
झाल्यावर start application करून समोर दिसत
असलेली सर्व माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.
त्यांनतर अर्ज सबमिट
करावा.
अंतिम दिनांक:
सदर शिष्यवृत्ती साठी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 असणार आहे.यामधे
थोडाफार बदल होऊ शकतो.
शिष्यवृत्ती रक्कम:
शालेय विद्यार्थी 6 ते 12 यासाठी प्रोत्साहनपर मिळणारी शिष्यवृत्ती ही 15000 असणार आहे.
एकूण कोट्यापैकी 50% शिष्यवृत्ती ही मुलींसाठी राखीव असेल.
तसेच अनुसूचित जाती असेच
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
2) SBIF Asha Scholarship Program For undergraduate students ( पदवीपूर्व शिष्यवृत्ती):
पात्रता:
1) अर्जदार
विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
2) कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी
असावे.
3) शासनाने सूचीबद्ध
केलेल्या विद्यापीठ किव्वा महाविद्यालयात विद्यार्थी हा पदवीपूर्व शिक्षण घेत
असावा.
4) मागील वर्षात
कमीत कमी 75 टक्के मार्क मिळवणे
आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) मागील वर्षीची
गुण पत्रिका
3) चालू वर्षात
प्रवेश घेतलेली पावती
4) चालू वर्षात शिकत
असलेबाबातचे बोनाफाईड सर्टिफिकेट,ओळखपत्र किव्वा
प्रवेश पत्र यापैकी एक.
5) स्वतःचे किव्वा
पालकांचे बँक डिटेल्स.
6) जातीचा दाखला
अर्ज भरण्याची प्रक्रिया:
विद्यार्थ्यांनी apply
now येथे क्लिक करून वरीलप्रमाणे रजिस्टर करावे व सर्व माहिती भरून कागदपत्रे
अपलोड करावीत व submit करावे.
अंतिम मुदत: 31 ऑक्टोबर.
शिष्यवृत्ती रक्कम: 50,000 पर्यंत.
3) SBIF Asha Scholarship Program For postgraduate students ( पदव्युत्तर विदयार्थी शिष्यवृत्ती):
पात्रता:
1) अर्जदार
विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
2) अर्जदार
विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय यामध्ये पदवीत्तर शिक्षण घेत
असावा.
3) विद्यार्थ्याने
मागील वर्षांमध्ये कमीत कमी 75 टक्के मार्क
मिळवणे गरजेचे आहे.
4) कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे:
1) विद्यार्थ्याचे
आधार कार्ड
2) मागील वर्षीची
मार्कशीट
3) चालू वर्षात
प्रवेश घेतलेबाबत पावती
4) चालू वर्षात शिकत
असलेबाबातचे बोनाफाईड सर्टिफिकेट/ओळखपत्र
5) स्वतःचे किव्वा
पालकांचे बँक तपशील
6) जातीचा दाखला
शिष्यवृत्ती रक्कम: 70,000
अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 31 ऑक्टोबर 2024.
4) SBIF Asha Scholarship Program For IIT STUDENTS:
पात्रता:
1) अर्जदार
विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
2) अर्जदार
विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय यामध्ये पदवीत्तर शिक्षण घेत
असावा.
3) विद्यार्थ्याने
मागील वर्षांमध्ये कमीत कमी 75 टक्के मार्क
मिळवणे गरजेचे आहे.
4) कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी
असावे.( 3 लाख वार्षिक उत्पन्न
असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य)
5) महिला
विद्यार्थ्यांना 50 टक्के कोटा
राखीव असेल.
6) अनुसूचित जाती
तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
शिष्यवृत्ती रक्कम: 2 लाखापर्यंत.
अंतिम मुदत: 31 ऑक्टोबर 2024.
आवश्यक कागदपत्रे: वरीप्रमाणे.
अर्ज करण्याची पद्धत:
वरीप्रमाणे.
5) SBIF Asha Scholarship Program For IIM Students:
पात्रता:
1) अर्जदार
विद्यार्थ्याने भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीए किंवा पी जी
डी एम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
2) सदर विद्यार्थी
हा भारताचा रहिवासीय असावा. '
3) विद्यार्थ्याने
मागील शैक्षणिक वर्षांमध्ये 75 टक्के मार्क
मिळवणे आवश्यक आहे.
4) कौटुंबिक उत्पन्न
सहा लाखाच्या आत मध्ये असावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत मध्ये आहे त्यांना प्राधान्य दिले
जाईल.
5) अनुसूचित जाती
जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
6) 50 टक्के कोटा
महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल.
शिष्यवृत्ती रक्कम: या
शिष्यवृत्ती अंतर्गत सर्वात जास्त रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्याला दिली जाते
ती रक्कम म्हणजे 7,50,000 इतकी असेल.
आवश्यक कागदपत्रे:
वरीप्रमाणे.
अर्ज करण्याची पद्धत:
वरीलप्रमाणे. "
अर्ज करण्याची अंतिम
दिनांक: 31 ऑक्टोबर 2024.
शिष्वृत्तीसाठी
विद्यार्थ्यांची अतीम निवड प्रक्रिया:
स्टेट बँक फाउंडेशन
शिष्यवृत्ती 2024 निवड शैक्षणिक
गुणवत्ता तसेच आर्थिक पार्श्वभूमी नुसार केली जाते. यामध्ये जे विद्यार्थी पात्र
असतील त्यांची प्राथमिक शॉर्टलिस्ट केली जाते व त्यांचे टेलिफोनिक मुलाखत घेतली
जाते व अंतिम निवडीसाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
ज्या विद्यार्थ्यांची या
शिष्यवृत्ती साठी निवड होईल त्यांना आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट
शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाईल. ही रक्कम एकदाच असणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी