bandhkam kamgar yojana 2024: बांधकाम कामगार योजना 2024

 

bandhkam kamgar yojana: योजना एक फायदे अनेक आजच करा अर्ज.

शासनामार्फत अनेक गरजू, विशिष्ठ वर्गांसाठी खूप महत्वपूर्ण तसेच उपयुक्त योजना राबविल्या जातात.याचा अनेक पात्र लाभार्थ्यांना उपयोग होतो देखील मात्र,अनेक जणांना योजनांची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहतात.मात्र त्यांना त्या योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे.
नमस्कार मित्रांनो, amnews मध्ये आपले स्वागत आहे,आज आपण बांधकाम कामगार तसेच त्या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या कामगारांसाठी उपयुक्त असणाऱ्या 'bandhkam kamgar yojana' 
या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

bandhkam-kamgar-yojana-2024
bandhkam kamgar yojana 2024


बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणारे अनेक कामगार काम करत असतात.काही कामगार आपल्या घरापासून दूर काम करण्यासाठी येतात यातील अनेक जण कमी पैशांमध्ये हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत असतात.अनेक कामगार तर विना सेफ्टी किटचे काम करतात त्यामुळे त्यांचे अपघात होतात,काहींना अपंगत्व येत तर काही ठिकाणी मृत्यू देखील होतात त्यामुळे त्यांच्या घरावर उपासमारीची वेळ येते.या सर्व बाबींचा विचार करून 1 मे 2011 रोजी राज्य शासनामार्फत कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.
रस्ते इमारती किंवा मोठमोठे पूल बांधणारे बांधकाम कामगार हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते अनेक अवघड किंवा धोकादायक ठिकाणी काम करत असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली यामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ म्हणजेच MBOCW या संस्थेचे स्थापना 
केली  यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते व त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक त्याच बरोबर आरोग्याविषयी देखील सेवा पुरवल्या जातात.

या योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना:

1) सामाजिक सुरक्षा योजना:
बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचबरोबर त्याच्या मुलीच्या विवाह साठी देखील अर्थसाह्य दिले जाते.


प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या अंतर्गत शासनाचे विविध लाभ दिले जातात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा लाभ देखील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिला जातो. "
bandhkam kamgar yojana" 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याचबरोबर अटल पेन्शन योजना या दोन्ही योजनेचा लाभ देखील या योजनेअंतर्गत घेतला जाऊ शकतो.


कौशल्य वृद्धी योजना.


घरकुल योजना.


स्मार्ट कार्ड.


2)शैक्षणिक योजना:
*बांधकाम कामगाराच्या पहिली ते सातवीच्या मुलांना प्रतिवर्षी अडीच हजार रुपयांचे सहाय्य केले जाते. form link 


*आठवी ते दहावीच्या मुलांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. 
इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त झाले असल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळू शकते.form link 


*अकरावी व बारावीच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
मुलांना तसेच कामगाराच्या पत्नीस पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्यास त्यासाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपयांचे अनुदान व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे अनुदान देखीलदिले जाते. form link


*अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी साठ हजार रुपये.


*नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन मुलांस एम एस सी आय टी शिक्षणासाठी पूर्ण शुल्क दिले जाते. form link


*आयटीआय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू होते.


*बांधकाम कामगारांच्या मुलासाठी पीएचडी त्यासोबत परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.


*शैक्षणिक पुस्तके भेट दिली जातात.


3) आरोग्य योजना:
*बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी 15000 रुपयांचे सहाय्य दिले जाते त्यासोबत सिजेरियन प्रसूतीसाठी वीस हजार रुपयांचे सहाय्य दिले जाते. form link


*बांधकाम कामगाराच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य सोबत बांधकाम कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजारासाठी एक लाखांचे आर्थिक सहाय्य देखील दिले जाते.


*जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख रुपयांचे मुदत ठेव बंद दिली जाते.form link


*बांधकाम कामगार काम करत असताना काही अपघात झाल्यात त्याला 75 टक्के किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये दोन लाखाची मदत दिली जाते.


*बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत व्यक्तीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील घेता येतो.form link


*बांधकाम कामगार दवाखान्यात भरती असेपर्यंत त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्यक दिले जाते.


*नोंदणीकृत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी देखील केली जाते.


4) आर्थिक सहाय्य:
*बांधकाम कामगारांना काम करण्यासाठी आवश्यक असणारे अवजारे खरेदी करण्यासाठी तीन वर्षातून एकदा पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते या पैशातून बांधकाम कामगारांना बांधकाम क्षेत्रात जी आवश्यक अवजारे आहेत ती खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. 


*जर एखाद्या कामगाराचा काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. form link


*बांधकाम कामगार पेटी योजना यामार्फत आवश्यक असणारे सर्व टूल किट एका पेटीमध्ये बांधकाम कामगाराला त्याच्या घरी पोच केले जाते.


*बांधकाम कामगार इतर नैसर्गिक कारणांनी मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना दोन लाखाचे आर्थिक अनुदान दिले जाते. 
bandhkam kamgar yojana 

form link 

*अटल बांधकाम कामगार योजना शहरी तसेच ग्रामीण अंतर्गत दोन लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते.


*एखाद्या 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी दहा हजारांचे सहाय्य केले जाते.


*एखाद्या पुरुष कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या पतीस पाच वर्षांसाठी 24 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.


*घर खरेदीसाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी देखील त्यांना अनुदान दिले जाते.
बांधकाम कामगाराच्या कुटुंबासाठी गृहपयोगी वस्तूंचे वितरण केले जाते.
वाहन चालक प्रशिक्षण देखील दिले जाते.


 अटी:
"बांधकाम कामगार नोंदणी" या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
मागील वर्षामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून त्या व्यक्तीने काम केलेले असावे.
ऑनलाईन पोर्टल वर नोंदनी आवश्यक.
नोंदणी करणाऱ्या कामगाराचे वय 18 ते 60 यामध्ये असावे.


 आवश्यक कागदपत्रे:
1) नमुना नं. 5 Form
Form download करण्यासाठी येथे क्लिक करा.

2) रहिवासी पुरावा:
आधार कार्ड/वीज बिल/ग्रामपंचायत रहिवासी दाखला यापैकी एक.

3) ओळखपत्र पुरावा: आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक.

4) पासपोर्ट साइज फोटो

5) वयाचा पुरावा:
जन्म दाखला/शाळा सोडलेला दाखला.

6) 90 दिवस काम केल्याबाबत प्रमाणपत्र: bandhkam kamgar yojana 

ग्रामपंचायत क्षेत्र असेल तर ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात असल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्याचा 90 दिवस काम केल्याचा दाखला किंवा कामगार ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणचा ठेकेदाराकडून मागील वर्षात 90 दिवस काम केले बाबतचा दाखला यापैकी एक दाखला आवश्यक असणारं आहे.

7) बँक पासबुक

8) मोबाईल क्रमांक

9) ईमेल आयडी

10) घोषणापत्र.


 अर्ज करण्याची पद्धत:
बांधकाम कामगार कल्याण योजनेअतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज भरून सर्व कागदपत्रे जोडून ती बांधकाम कार्यालयात जमा करावीत किव्वा online form भरण्यासाठी  mahabocw  
या वेसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.
आपण भरलेल्या फॉर्म चे verification होऊन जर आपले सर्व कागदपत्रे खरी असतील तर आपण सदर योजनेच्या सर्व लभांचा फायदा घेऊ शकतो.

टिप्पण्या