lek ladki yojana : लेक लाडकी योजना नवीन स्वरुपात राज्यात पुन्हा सुरु


lek ladki yojana



महाराष्ट्र शासनाने lek ladki yojana 2023  राज्यात नव्याने  सुरू केली आहे जी पात्र मुलींना आर्थिक लाभ देण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. नोंदणी केलेल्या पात्र मुलींना 101000 ची रक्कम ठराविक कालावधी नंतर मिळू शकते.या महत्वाच्या योजनेविषयी आपण आपल्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.

lek ladaki yojana
LEK LADKI YOJANA 



लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र


लेक लाडकी योजना हि मुलींना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देण्यासाठी चा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील असलेल्या विद्यार्थिनींना मदत करण्यासाठी स्थापन केला होता. लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत मुली चा जन्म झाल्यापासून त्या 18 वर्षे पूर्ण करतील तेव्हा त्यांना एकूण 101000 रुपये मिळतील. Lek Ladki Yojana
लाभार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यातील पिवळे किव्वा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना या च योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेचच 5000 रुपये दिले जातील,मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर रुपये 4000 मिळतील,इयत्ता सहावी मध्ये रुपये 6000 मिळतील व मुलगी इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर त्या मुलीस रुपये 8000 मिळतील आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यात त्या मुलीस रुपये 75,000 मिळेल असे या योजनेचे थोडक्यात स्वरूप आहे.



महाराष्ट्र लेक लाडकी योजना : 2023-24 lek ladki yojana marathi

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्याला एकूण रु. 101000 मिळणार आहे ज्याचा वापर मुलींच्या विविध आर्थिक खर्चासाठी करू शकते. या योजनेचा मुख्य हेतू मुलींना त्यांच्या शिक्षण ,आरोग्यासोबत आर्थिक मदत करणे हा आहे.  लेक लाडकी योजना राज्यात महाराष्ट्र शासनाअंतर्गत यापूर्वी देखील सुरु होती मात्र त्यातील काही त्रुटी दूर करून आता लेक लाडकी 2.0 सुरु करण्यात आली आहे त्यास एप्रिल २०२३ मध्ये मान्यता मिळाली आहे. Lek Ladki Yojana Maharashtra 2023

योजनेचा उद्देश - लाभार्थ्यांना आर्थिक मदत
योजनेचे उद्दिष्ट - 1 लाख रु
जे कुटुंब कमी उत्पन्न गटामध्ये असेल त्यांना आर्थिक मदत मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे.


लेक लाडकी योजना आर्थिक मदत:
या योजनेचा मुख्य हेतू पात्र कुटुंबांना त्यांच्या मुलीला आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे. या कार्यक्रमाची उद्दिष्टे मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणे आणि बालविवाह आणि कुपोषण समाप्त करणे हा आहे.
योजनेंतर्गत मुलीला जन्मापासूनच आर्थिक मदत मिळण्याची याची खात्री करणे तसेच ही योजना स्त्री भ्रूणहत्या कमी होण्यासही हातभार लावेल. Lek ladki yojana 
योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेचच 5000 रुपये दिले जातील,मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर रुपये 4000 मिळतील,इयत्ता सहावी मध्ये रुपये 6000 मिळतील व मुलगी इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर त्या मुलीस रुपये 8000 मिळतील आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मुलीचे वय १८ झालेनंतर त्या मुलीस रुपये 75,000 मिळेल  असे एकूण 1,01000 इतके रुपये मिळतील.


महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता निकष 2023:

लेक लाडकी योजना राज्य सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पा मध्ये सादर केली. या योजनेचा फायदा राज्यातील अल्प उत्त्पन्न असलेल्या मुलींना होईल. आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या घरात जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे. त्यातून मुलींचे शैक्षणिक जीवन सुकर होईल. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवा दृष्टिकोन घेत आहे. 'Lek Ladki Yojana'
अर्ज करनारा उमेदवार हा कायमस्वरूपी महाराष्ट्रात राज्यातील रहिवासी असावा.
उमेदवार हि मुलगी असणे आवश्यक आहे.
सदर मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा.
ज्याना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे.
• पहिल्या अपत्यासाठी तिसर्या हप्त्यासाठी किव्वा दुसर्या अपत्याच्या दुसर्या हप्त्यासाठी मुलीच्या माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

                   
👉शासन निर्णय पहा 👈


महाराष्ट्र लेक लाडकी अर्ज 2023-24 आवश्यक कागदपत्रे

ज्यांना लेक लाडकी योजना 2023 साठी अर्ज सादर करायचे आहेत त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की त्यांना अर्ज प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे सरकारी मान्यताप्राप्त आणि प्रमाणित असावीत.

जन्म नोंदणी
• आईचे 
आधार कार्ड
• मुलीचे आधार कार्ड (पहिल्या लाभावेळी अट शिथिल)
• आई वडिलांसोबत मुलीचा फोटो.
• पालकांचे 
निवडणूक ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( 1 लाखाच्या आतील )
• रेशन कार्ड
• बँक पासबुक 
• मुलीचे वय १८ झालेनंतर मतदान यादीत नाव असणे आवश्यक.
• अंतिम लाभवेळी मुलीचे लग्न झालेले नसणे आवश्यक.


महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्य आणि फायदे:
• मुलींच्या पालकांना आर्थिक अडचण दूर होण्यास मदत.
लेक लाडकी महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी सुरू केली होती.
मुलीच्या जन्मापासून ते मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला शिक्षणासाठी सरकार लेक लाडकी योजनेद्वारे आर्थिक सहाय्य पुरवेल. "Lek Ladki Yojana"
योजनेच्या लाभांचा लाभ घेऊन मुलगी तिचे सर्व शिक्षण पूर्ण करू शकेल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या कुटुंबातील मुलींना लाभ.



महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी नोंदणी करण्याचे टप्पे:
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील सूचनांचे पालन करावे लागेल. 
अर्ज प्रक्रिया हि आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करावी लागणार आहे.
                         lek ladki yojana form 
                      👉अर्ज डाउनलोड करा 👈

वरील अर्ज आपण प्रिंट करू शकता किव्वा अंगणवाडी मध्ये देखील उपलब्ध असेल हा अर्ज व्यवस्थित भरून अंगणवाडी सेविका यांचेकडे देऊन त्या सर्व माहिती देतील.


टिप्पण्या