reliance foundation scholarship 2023: या शिष्यवृत्ती मधून मिळवा 2 लाखापर्यंत स्कॉलरशिप

 reliance foundation scholarship 2023: या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करा आणि मिळवा 2 लाखापर्यंत स्कॉलरशिप 

Reliance Foundation Scholarship 2023
Reliance foundation scholarship 2023


 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आपल्याला माहीतच असेल की मोठमोठ्या नामांकित   कंपन्यांमार्फत अनेक प्रकारचे सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आज आपण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी माहिती  पाहणार आहोत. आज आपण रिलायन्स या मोठ्या नामांकित कंपनीच्या फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या  reliance foundation scholarship 2023 या शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती जाणून  घेणार आहोत.


योजनेची वैशिष्टे:reliance foundation scholarship 2023 undergraduate

मित्रांनो आपण वरती सांगितल्याप्रमाणे अनेक कंपन्या या ठराविक रक्कम फंडिंग साठी वापरत असतात.जसे आपण मागील लेखामध्ये पहिलेच असेल की आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप या शिष्यवृत्ती मध्ये देखील इयत्ता 1 ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 60,000 पर्यंत   स्कॉलरशिप दिली जाते. Reliance foundation scholarship मध्ये जे विद्यार्थी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज किव्वा विद्यापीठातून पूर्ण वेळ पदवीच्या प्रथम वर्षांमध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी रिलायंस फाऊंडेशन 2 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप प्रदान करते.

देशात अनेक असे प्रतिभावंत विद्यार्थी असतात की,ज्यांना शिकण्याची इच्छा असते,त्यांच्यात अनेक कलागुण असतात. मात्र केवळ आर्थिक परिस्थिती खराब असल्या कारणाने ते पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही.मात्र अनेक योजना किव्वा शिष्यवृत्ती असतात ज्यांअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळू शकते.मात्र अशा योजना सामान्य लोकांपर्यंत पोचणे आवश्यक असते.

 रिलायंस फाऊंडेशन मार्फत 12 वी नंतर चे शिक्षण जे की 3 किव्वा 4 वर्षाचे असेल त्यासाठी जर आपली निवड झाली  तर  पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी देशातील 5000 पात्र विद्यार्थ्यांना रिलायंस फाऊंडेशन मार्फत 2 लाख रुपये प्रदान केले जातात.

आणि ही रक्कम थेट संबधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होते.विद्यार्थी या रकमेतून आपले हॉस्टेल खर्च, ट्युशन खर्च, लॅपटॉप कम्प्युटर खरेदी, पुस्तके किव्वा काही कोर्स जॉईन करायचे असतील ते सर्व सहज करता येतील.या स्कॉलरशिप साठी कसलाही खर्च नाही.फॉर्म भरणेपासून ते स्कॉलरशिप मिळेपर्यंत सर्व मोफत आहे त्यामुळे याचा गरजू विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

 रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती ही योजना 2023-24 चालू शैक्षणिक वर्षासाठी 5,000 पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारत आहे. अभ्यासाच्या सर्व प्रकरच्या  क्षेत्रातील प्रथम वर्षाच्या नियमित पदवीधर विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचा उद्देश उच्च शिक्षणात प्रवेश करण्यास मदत करणे आणि विद्यार्थी व पालकांवरील आर्थिक ओझे कमी करणे हा आहे. रिलायन्सचे अध्यक्ष श्री धीरूभाई अंबानी यांच्या संकल्पनेवर आधारित  या शिष्यवृत्ती पुढील दहा वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या वचनबद्धतेचाच एक भाग आहे. सदर शिष्यवृत्तीमध्ये आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास  आणि अपंग व्यक्तींच्या अर्जांना प्रोत्साहन दिले जाते.

 उच्च शिक्षणासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक शिष्यवृत्ती योजनेपैकी एक असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती  2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी 5,000 पदवीपूर्व विद्यार्थ्यांना प्रदान करण्याचे निश्चीत केले आहे.

 शिष्यवृत्ती अभ्यासाच्या सर्व शाखांमधील  प्रथम वर्षाच्या नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. यासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना  यशस्वी व्यावसायिक बनण्यास आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करणे हे आहे.

 आर्थिक सहाय्याव्यतिरिक्त  सर्वांगीण विकासाच्या संधी देखील देतात. हा कार्यक्रम मुली आणि अपंग लोकांच्या अर्जांना प्रोत्साहन देतो.

 रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रम हा रिलायन्स फाऊंडेशनने भारतातील शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. 1996 पासून, धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती आणि रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीच्या अंतर्गत रिलायन्सने 18,000 पेक्षा जास्त तरुणांना शिष्यवृत्ती दिली आहे.

 ही स्कॉलरशिप प्रामुख्याने मेरिट प्लस नीड तत्वावर आधारित आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत,ते हुशार आहेत व त्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देखील आवश्यक आहे.त्यामुळे ज्यांना अशा योजनेची आवश्यकता आहे त्याच्यापर्यंत ही माहिती पोचविणे गरजेचे आहे.



 पात्रता: reliance foundation scholarship 2023 eligibility

1) अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.

2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15 लाखापेक्षा कमी असावे.( 2.5 लाखापेक्षा कमी असल्यास प्राधान्य) reliance foundation scholarship 2023

3) इयत्ता 12 मध्ये कमीत कमी मार्क्स  60% पेक्षा जास्त असावे.

4) पदवीच्या प्रथम वर्षात पूर्णवेळ शिक्षण घेणारा विद्यार्थी असावा.

5) प्रथम वर्षासाठी चालू वर्षी प्रवेश घेतलेला असावा.



 कोण असेल अपात्र:

1) जे विद्यार्थी द्वितीय किव्वा पुढच्या वर्षात आहेत असे विद्यार्थी.

2) ऑनलाइन, रिमोट, डिस्टन्स किंवा इतर कोणत्याही नॉन-रेग्युलर पद्धतींद्वारे पदवी घेणारे विद्यार्थी.

3) दहावीनंतर डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अपात्र असतील.

4) 2 वर्षे कालावधीसाठी पदवीपूर्व  पदवी घेत असलेले विद्यार्थी अपात्र राहतील.

5) जे विद्यार्थी  अभियोग्यता म्हणजेच aptitude टेस्ट देणार नाहीत असे विद्यार्थी.

6) जे विद्यार्थी परीक्षेदरम्यान कॉपी सारखे गैरप्रकार करतील असे विद्यार्थी देखील या स्कॉलरशिप साठी अपात्र असणार आहेत.



आवश्यक कागदपत्रे: 

1) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.

2) कायमस्वरूपी रहिवासी पुरावा.

3) इयत्ता 10 व 12 ची गुणपत्रिका.

4) चालू वर्षाचे कॉलेज मधील बोनाफाईड सर्टिफकेट.

5) वार्षिक उत्पन्नाचा दाखला. 'Reliance foundation scholarship 2023'

6) अपंग असल्यास शासकीय प्रमाणपत्र.


अर्ज प्रक्रिया:reliance foundation scholarship 2023 apply online

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यासाठी येथे क्लीक करा (साईट ओपन न झाल्यास मागे येऊन पुन्हा लिंक वर क्लिक करा) या साईटवर जाऊन सर्व बेसिक माहिती भरावी लागेल जसे कि,नाव,कोणत्या शाखेतून पदवी घेत आहात,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इत्यादी हि माहिती भरून submit वर क्लिक करावे.

सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपणास एक मेल प्राप्त होईल त्यातील लिंक वर क्लिक करून लॉगीन करायचे आहे.यामध्ये 5 प्रकारच्या माहिती भरायच्या आहेत जसे जनरल माहिती,accadmic details,awards/achievements,saporting documents व review application इत्यादी.

सर्व माहिती भरून फायनल submit करावे. यानंतर आपणास अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागेल त्याची सर्व माहिती मेल द्वारे प्राप्त होईल.सदर टेस्ट होऊन पास झालात तर प्रारंभिक निवड होऊन स्कॉलरशिप मिळू शकते. "Reliance foundation scholarship 2023"

👉aptitude test मध्ये येणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

(लिंक ओपन न झाल्यास मागे येऊन पुन्हा लिंक ओपन करावी)


महत्त्वाची सूचना:

1) तुम्ही योग्यता चाचणी पूर्ण झाल्यानंतर  अर्ज  पूर्ण  मानले जातील. चाचणी सबमिट केल्यावर गुण थेट रिलायन्स  फाऊंडेशनला पाठवले जातील. अर्जदारांना त्यांच्या स्कोअरबद्दल सूचित केले जाणार नाही.

2) सर्व अर्जदारांनी त्यांच्या अर्जाचा भाग म्हणून ऑनलाइन अनिवार्य योग्यता चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

3) एकदा अर्ज सबमिट केल्यावर, अर्जदारांना ऑनलाइन परीक्षेची तारीख/वेळ आणि कंपॅटिबिलिटी तपासणी करण्यासाठी सूचनांसह एक ईमेल प्राप्त होईल.



अंतिम तारीख:

Reliance foundation scholarship 2023 साठी अर्ज करणेची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2023 असणार आहे.त्यामळे पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून aptitude टेस्ट ची तयारी करावी.ही टेस्ट डिसेंबर महिन्यात होणार आहे.

आपणास स्कॉलरशिप किव्वा टेस्ट बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण 7977100100 या नंबरवर WHATSAPP करू शकता किव्वा  (011) 4117 1414 नंबरवर फोन करू शकता.





टिप्पण्या