pwd recruitment 2023: सार्वजनिक बांधकाम विभागात होत आहे मोठी भरती.


PWD RECRUITMENT 2023

 नमस्कार मित्रांनो,आपण आपल्या लेखांमध्ये सरकारी नोकर भरती विषयी माहिती पाहत असतो.आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत राबविल्या जाणाऱ्या PWD RECRUITMENT 2023 या भरती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

pwd recruitment 2023
pwd recruitment 2023



pwd recruitment:

मित्रांनो, राज्य शासनाच्या public work department अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागा ग्रुप B व ग्रुप C अंतर्गत मोठी भरती होणार असून या भरतीमध्ये विविध पदांसाठी तब्बल 2109 रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे.यामधे शिपाई,वरिष्ठ लिपिक,वाहन चालक,प्रयोगशाळा सहाय्यक,लघुलेखक, तसेच कनिष्ठ अभियंता व इतर असे एकूण 14 प्रवर्गासाठी ची भरती होणार आहे.याबाबत शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे,त्यामुळे जे उमेदवार इच्छूक तसेच पात्र असतील त्यांनी भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत.


पदांची विभागणी:

1) शिपाई - 41 जागा.

2) स्वच्छक - 32 जागा.

3) वाहन चालक - 2 जागा.

4) प्रयोगशाळा सहाय्यक - 5 जागा.

5) स्वच्छता निरीक्षक - 1 जागा.

6) वरिष्ठ लिपिक - 27 जागा.

7) उद्यान पर्यवेक्षक - 12 जागा.

8) सहाय्यक वास्तुशास्त्र - 9 जागा.

9) लघुलेखक ( निम्नश्रेणी) - 2 जागा.

10) लघुलेखक ( उच्च श्रेणी) - 8 जागा.

11) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) - 532 जागा.

12) कनिष्ठ अभियंता ( विद्युत) - 55 जागा.

13) कनिष्ठ वास्तूशात्र - 5 जागा.

14) स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक - 1387 जागा.

एकूण जागा - 2109.


शैक्षणिक पात्रता

1) शिपाई (ग्रूप C): 10 वी.


2) स्वच्छक (ग्रुप C): 10 वी.


3) चालक (ग्रुप C): 10 वी.


4) प्रयोगशाळा सहाय्यक (ग्रुप C ): रसायनशास्त्रातील मुख्य विषयासह विज्ञानातील शाखेतून पदवी.


5) स्वच्छता निरीक्षक (ग्रूप C ): 10 वी (मॅट्रिक्युलेशन).

 Pwd recruitment 2023

6) वरिष्ठ टायपिस्ट (ग्रूप C ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 


7) उद्यान निरीक्षक (ग्रूप C ): कृषी किंवा फलोत्पादनातील पदवी.


8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुविशारद (ग्रुप C ): आर्किटेक्चरमधील पदवी.


9) लघुलेखक (उच्च श्रेणी) (ग्रूप B नॉन-राजपत्रित): 10 वी आणि किमान टायपिंगचा स्पीड इंग्रजीमध्ये 120 WPM किंवा इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 40 WPM किंवा मराठी शॉर्टहँडमध्ये 30 WPM


10) लघुलेखक (नीन्म श्रेणी) (ग्रूप B )नॉन-राजपत्रित): 10 वी आणि टायपिंगचा इंग्रजी साठी 100 WPM किंवा इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 40.


11) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रूप B अराजपत्रित): 3-वर्षाचा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष.


12) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (ग्रुप B अराजपत्रित): इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा समकक्ष.


13) कनिष्ठ वास्तुविशारद (ग्रुप B अराजपत्रित): वास्तुशास्त्रातील पदवी असावी.


14) असिस्टंट आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (ग्रूप C): आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा.


वयोमर्यादा:

PWD मधे अर्ज करणेसाठी ग्रुप B किव्वा ग्रुप C साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 40 दरम्यान असावे.तसेच मागासवर्गीय,अनाथ किव्वा आर्थिक दुर्बल घटकांसाठी वयाच्या अटेमध्ये 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.  Pwd recruitment 2023


अर्ज शुल्क: 

अर्जदारांच्या श्रेणीनुसार अर्जाची फी बदलते. खुल्या प्रवर्गांतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी 1000 इतके शुल्क आहे, तर राखीव प्रवर्गातील, ज्यामध्ये मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचा समावेश आहे अशा उमेदवारांना फी 900 रुपये इतकी आहे.


अर्ज पद्धत: pwd recruitment 2023 apply online

* सार्वजनिक बांधकाम विभागा मध्ये अर्ज करण्याची पध्दत आँनलाईन स्वरूपाची आहे.पात्र उमेदवारास अर्ज करण्यासाठी mahapwd.com या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.


* "PWD महाराष्ट्र 2023" अंतर्गत गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी "apply online" वर क्लिक करा.

 "Pwd recruitment 2023"

* तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरणे आवश्यक आहे जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क माहिती.


* आता तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती द्यावी लागेल, जसे की शाळेचे/कॉलेजचे नाव, उत्तीर्ण होण्याचे वर्ष.


* तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती, छायाचित्र आणि स्वाक्षरीसह अपलोड करण्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करा.


* शेवटी अर्ज शुल्क भरावे लागेल आणि ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या भरतीसाठी अर्ज submit करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 असणार आहे.

सदर माहिती आपणास आवडली असेल तर ती इतरांसोबत देखील शेअर करावी.

टिप्पण्या