aditya birla scholarship: या अंतर्गत पहिली ते पदवी शिक्षण घेणाऱ्यांना मिळते ६० हजारापर्यंत स्कॉलरशिप
aditya birla scholarship: या अंतर्गत पहिली ते पदवीधारकांना मिळते ६० हजारापर्यंत स्कॉलरशिप
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार,आजचा लेख आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.आज आपण aditya birla scholarship या एका अशा स्कॉलरशिप बद्दल माहित घेणार आहोत ज्यामध्ये पहिली ते अगदी पदवी पर्यन्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप चा फायदा होऊ शकतो. व यातून रुपये 18,000 ते 60,000पर्यत स्कॉलरशिप मिळणार आहे.
नेमकी हि योजना काय आहे,त्यासाठी पात्रता काय असणार आहे,कोण अर्ज करू शकतो,अर्ज कसा करायचा,शेवटची तारीख काय असणार आहे हे पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Aditya Birla scholarship |
Aditya Birla scholarship 2023:
शालेय शिक्षण घेत असताना आपण अनेक प्रकारच्या शासकीय स्कॉलरशिप पाहिल्या असतील किव्वा प्रत्यक्षात त्याचा लाभ देखील घेतला असेल. बऱ्याच वेळेस अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक बाजू चांगली नसल्यामुळे पूर्ण होत नाही. स्कॉलरशिप च्या मदतीने आपल्याला शिक्षण घेण्यासाठी खूप फायदा होतो. बरेच विद्यार्थी सध्या सरकारी स्कॉलरशिप घेत असतील हि, मात्र आपण आदित्य बिर्ला ग्रुप च्या aditya birla capital scholarship या स्कॉलरशिप विषयी माहिती घेत आहोत यामुळे आपण जरी एखादी सरकारी स्कॉलरशिप घेत असाल तरी देखील यासाठी अर्ज करू शकता व त्याचा लाभ देखील मिळवू शकता जेणेकरून आपल्याला शिक्षण घेण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही.
What Is Aditya Birla scholarship
हि शिष्यवृत्ती चार प्रकारात विभागली असून त्यानुसार स्कॉलरशिप मिळणार आहे.
1) 1 ते 8 वी : या स्कॉलरशिप मध्ये अर्ज करणारे विद्यार्थी हे इयत्ता पहिली ते आठवी दरम्यान असणे आवश्यक आहे. व मागील वर्षी 60% गुण असणे आवश्यक आहे म्हणजेच एखादा विद्यार्थी,विद्यार्थिनी आठवीसाठी अर्ज करत असेल तर त्याला इयत्ता सातवी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. या वर्गामधील विद्यर्थ्यांना 18,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते.
2) 9 ते 12 वी : या साठी विद्यार्थी हे नववी ते बारावी वर्गात असणे आवश्यक आहे. यामध्ये रुपये 24,000 पर्यंत स्कॉलरशिप भेटू शकते. यामध्ये देखील मागील वर्गामध्ये 60% गुण असणे आवश्यक असणारा आहे. aditya birla scholarship
३) पदवीपूर्व : या प्रकारामध्ये जे विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून ग्रॅजुएशन करत असतील असे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. या स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थ्यांना 36,000 रुपये इतका लाभ घेता येईल.
४) प्रोफेशनल अंडर ग्रॅजुएट: जे विद्यार्थी प्रोफेशनल पदवी घेत असतील म्हणजेच ज्या कोर्स साठी सि.ई.टी देणे आवश्यक असते असे इंजिनिअरिंग,फार्मसी करणारे विद्यार्थी,BBA करणारे विद्याथी जे मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घेत आहेत व ज्यांना मागील वर्षी 60% गुण आहेत असे विद्यार्थी हि शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणार आहेत.या स्कॉलरशिप अंतर्गत रुपये 60,000 रुपयांपर्यन्त स्कॉलरशिप भेटणार आहे.
पात्रता : aditya birla scholarship eligibility
१) अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
२) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांच्या आत असावे.
३) अर्ज करणारे विद्यार्थी योजनेच्या निकषानुसार इयत्ता पहिली ते अंडर ग्रॅज्युएट असावे.
४) मागील वर्षांमध्ये त्या विद्यार्थ्यास किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. aditya birla scholarship
५) आदित्य बिर्ला व सह कंपनी मध्ये विद्यार्थ्यांचे पालक कर्मचारी नसावेत.
आवश्यक कागदपत्रे:
1) अर्जदाराच्या पासपोर्ट आकाराचा फोटो.
2) मागील वर्षीची मार्कशिट.
3) आधार कार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड यापैकी एक शासकीय ओळखपत्र.
4) फी पावती/प्रवेश पत्र/प्रवेश घेतलेल्या संस्थेचे ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा. 'aditya birla scholarship'
5) विद्यार्थी किव्वा पालक यांचे बँक खाते माहिती.
6) उत्पन्नाचा दाखला.
अर्ज करण्याची प्रक्रिया: aditya birla scholarship apply online
Aditya Birla capital scholarship साठी अर्ज प्रक्रिया online पद्धतीने असणार आहे.त्यासाठी 👉aditya birla capital scholarship 👈या ऑफिसियली साईट वर जावे लागेल. "aditya birla scholarship"
या साईट वर 1 ते 8,9 ते 12, जनरल ग्रॅज्युएशन तसेच प्रोफेशनल ग्रॅज्युएशन या साठी सेपरेट सर्व माहिती तसेच अर्ज करण्यासाठी चा टॅब दिला आहे.यावरील सर्व माहिती व्यवस्थित वाचून apply now या टॅब वर क्लिक करून विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अंतिम तारीख:aditya birla scholarship last date
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 ही आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेच आपला फॉर्म सादर करावा व स्कॉलरशिप मिळवावी.
निवड प्रक्रिया:
1) सर्व फॉर्म पैकी विद्यार्थ्यांचे मार्क्स तसेच आर्थिक स्थिती यावरून फॉर्म चे विभाजन केले जाईल.
2) सर्व कागदपत्रे तपासले जातील.
3) कागदपत्रे बरोबर असल्यास संबधित विद्यार्थ्यांसोबत फोन वर चर्चा केली जाईल.
4) स्कॉलरशिप देनेसाठी अंतिम निर्णय आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप फाऊंडेशन चा असेल.
ही माहिती विद्यार्थी मित्रांना आवडली असेल तर ती इतरांना देखील अवश्य शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी