land record maharashtra: स्वताच्या जमिनीची मालकी सिद्ध करणारे हे कागदपत्रे जवळ असणे आहे आवश्यक

land record maharashtra: 

land record maharashtra: स्वताच्या जमिनीची मालकी सिद्ध करणारे हे कागदपत्रे जवळ असणे आहे आवश्यक :


बंधू भगिनींनो नमस्कार, आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत की, असे कोणते पुरावे आहेत की ज्याद्वारे आपण जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करू शकतो. किवा एखाद्या जमिनीवर कोणाची मालकी आहे हे पाहू शकते.त्यामुळे आपण land record Maharashtra बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

land record maharashtra
land record maharashtra



आवश्यकता:

अनेक  वेळा जमिनीमुळे,स्थावर मालमत्तेमुळे वाद झाल्याचे आपण आपल्या आजूबाजूला पाहत  असतो अशा प्रकरणांमुळे न्यायालयात देखील सर्वात जास्त खटले हे  दाखल आहेत.असे अनेक प्रकरणे आहेत कि ज्यामध्ये पुरावे नसल्या कारणाने जमिनीची मालकी सिद्ध करता येत नाही. land record Maharashtra

आपण आजूबाजूला पाहिले असेल की जमिनीचा मूळ मालक हा एक असतो. तसेच जमीन कसणारा हा वेगळा असतो . अशा कित्येक जमिनी असतात ज्या वर्षानुवर्षे पडून असतात या जमिनीच्या मुळ मालका विषयी कोणालाच माहिती नसते. तसेच अशा  जमीन कोणाच्या मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याजवळ जमिनीसंबंधीचे महत्त्वाचे पुरावे असणे गरजेचे आहे.याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सात बारा वर काही गोष्टी असतात ज्यामुळे आपणास अनेक निर्बंध येतात यामुळे आपली जमीन सुरक्षित आहे का  हे पाहणे  महत्वाचे असते.



महत्वाचे दस्तावेज:

1) सातबारा उतारा:

जमिनीच्या मालकी संबंधित सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा उतारा याकडे पाहिले जाते. 7/12 नमुना  यामध्ये संबंधित शेतकऱ्याकडे त्या गटामध्ये किती जमीन आहे हे समजते. तसेच यामध्ये भूधारण पद्धत देखील नमूद केलेले असते यावरून त्या जमिनीचा मालक कोण आहे हे स्पष्ट होते.


2) खरेदी खत:

शेतकरी बंधूंनो जेव्हा पण एखाद्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो त्यावेळेस आपण खरेदीखत हा शब्द नक्कीच ऐकला असेल. जेव्हा पण जमीन खरेदी विक्री होते तेव्हा खरेदीखत केले जाते. या खरेदीखतावर त्या जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला तसेच किती क्षेत्राचा व्यवहार झाला आहे, ती जमीन किती रकमेस दिली गेली आहे तसेच कोणत्या दोन व्यक्तींमध्ये तो व्यवहार झाला आहे याची सर्व माहिती खरेदी खतावर असते. खरेदीखत हे अत्यंत महत्त्वाचे असे दस्तावेज असते. एकदा का खरेदीखत झालं की ती माहिती फेरफार वर लागते व त्यानंतर सातबारावर नवीन खरेदी केलेल्या मालकाचे नोंद होते.


3) 8 अ: 

अनेक शेतकऱ्यांची जमीन हे एकाच गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते अशा वेळेस ८अ या उताऱ्यामध्ये त्या शेतकऱ्याची त्या गावातील सर्व जमीन किती आहे हे एकत्रितपणे दिले गेलेले असते.

land record Maharashtra

तसेच आपल्या मालकीचे जमीन कोणत्या गटात किती आहे हे देखील समजते त्यामुळे ८ अ हा देखील जमिनी संबंधी महत्त्वाचा उतारा समजला जातो.


4) नकाशा:

जेव्हापण शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या मालकी संबंधी काही वाद निर्माण झाल्यास तसेच दोन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये काही फरक जाणवत असेल तर अशा वेळेस जमिनीची मोजणी केली जाते यावेळी आपल्या जमिनीचा नकाशा हा आपल्या जवळ असल्यास त्या जमिनीवरील आपण मालकी सिद्ध करू शकतो.तसेच जमीन चा आकार कसा आहे हे देखील समजते त्यामुळे जमिनीचा नकाशा जपून ठेवणे गरजेचे असते.

नकाशामध्ये सदर जमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचं नाव तसेच त्याच्या नावावर किती जमीन आहे याची माहिती दिलेली असते व आपल्या शेताला लागून कोणता गट नंबर आहे हे देखील नकाशावर दिलेले असते म्हणजेच शेजारी कोणता शेतकरी आहे हे समजते.


5) पावती:

तलाठी कार्यालय मार्फत आपणास दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो तो महसूल भरल्यानंतर तेथून आपल्याला एक पावती दिली जाते ही पावती देखील एक मालकी संबंधी महत्त्वाचा पुरावा समजला जातो.


👉या योजनेंतर्गत मिळतो  शेतकऱ्यांना अपघात विमा योजना 👈

 

6) प्रॉपर्टी कार्ड:

ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एखाद्या शेतकऱ्याचे जमिनी विषयी माहिती असते त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बिगर शेती जमीन, स्थावर मालमत्ता आहे, इमारत,उद्योग व्यवसाय असेल  याचा मालकी हक्काविषयी प्रॉपर्टी कार्ड मध्ये उल्लेख केलेला असतो. म्हणजेच बिगर शेती जमिनीवरील मालमत्ता हक्का संबंधी माहिती समजणारा दस्तावेज म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड.

'land record Maharashtra'

7) पूर्वीच्या खटल्यांचे कागदप्रत्रे:

अनेक वेळा एखाद्या जमिनी बाबत न्यायालयात पूर्वी खटला सुरू असेल तर त्या केस संबंधी महत्वाचे कागदपत्रे,जबाब प्रती या जपून ठेवणे खूप महत्वाचे असते.भविष्यात जर काही वाद उद्भवला तर हे कागदपत्रे महत्वाची ठरू शकतात.


इतर मालकीविषयी माहिती:

1) भोगवटादार वर्ग 1:

ज्या सातबारा उतारा वर भोगवटादार वर्ग 1 असे लिहिलेले असते अशा जमिनीवर शासनाने कोणतेही निर्बंध लावलेले नसतात. यामुळे शासन या जमिनी हस्तांतर करू शकत नाही म्हणजेच त्या जमिनीचा मूळ मालक हा शेतकरीच असतो हे स्पष्ट होते.


2) भोगवटादार वर्ग 2:

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर भोगवटादार वर्ग 2 असा उल्लेख असतो अशा जमिनी विकण्यास शासनाचे निर्बंध असते. यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय अशा जमिनींचे हस्तांतरण करता येत नाही व त्यांचा व्यवहार करता येत नाही.


3) भोगवटादार वर्ग 3 :

भोगवटादार वर्ग 3 म्हणजेच अशा जमिनी च्या सरकारी प्रवर्गात येतात म्हणजेच या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. "land record Maharashtra"


4) भोगवटादार वर्ग 4:

 भोगवटादार वर्ग 4 या जमिनी सरकारी मालकीच्याच असतात परंतु, त्या भाडेतत्त्वावर इतरांना दिलेल्या असतात अशा जमिनी भाडेतत्त्वावर 10,30,50 किंवा 99 वर्षाच्या मुदतीवर दिलेल्या असतात.


शेतकरी बंधू-भगिनींनो अशा पद्धतीने जमिनी संबंधी सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपली जमीन स्वताच्या ताब्यात सुरक्षित राहील.

सदर माहिती आपणास आवडली असल्यास ती इतरांसोबत देखील अवश्य शेअर करावी.

टिप्पण्या