ayushman card: हे कार्ड असल्यास मिळणार मोफत वार्षिक 5 लाख आरोग्य विमा.
ayushman card:
ayushman card: हे कार्ड असल्यास मिळणार मोफत वार्षिक 5 लाख आरोग्य विमा.
बंधू-भगिनींनो नमस्कार, आज आपण केंद्र शासनाच्या अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ayushman card की ज्या अंतर्गत कुटुंबाला पाच लाखापर्यंतच्या आरोग्य विमा तोही मोफत पणे मिळू शकतो.
सण 2018 मध्ये केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत 'आयुष्मान भारत योजना' किव्वा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत यामधील पात्र लाभार्थ्यांना प्रती कुटुंब प्रती वर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध करून दिला जातो तो ही अगदी मोफत.
या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कार्ड बनविणे आवश्यक असणारं आहे.हे कार्ड अत्यंत उपयुक्त असल्याने या कार्डला गोल्डन कार्ड देखील म्हंटले जाते.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 25 सप्टेंबर 2019 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देशभर सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब तसेच उपेक्षित कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य विमा मिळून त्यांना चांगली उपचार पद्धती मिळावी हा प्रामुख्याने या योजनेचा उद्देश आहे.
ayushman card |
योजनेची वैशिष्ट्ये:
आयुष्मान भारत योजना या योजनेच्या पात्र कुटुंबांना सर्वच आजारांवर 5 लाख रुपयांर्यंतचे मोफत उपचार केले जातात. रुग्णालयात दाखल केल्यानंतर चा सर्व खर्च कव्हर केला जातो. मात्र हा खर्च प्रती कुटुंब 5 लाख असला तरीही कुटुंबातील ज्या ज्या सदस्यांचे नाव यादीमध्ये आहे किव्वा ज्या व्यक्तीचे नाव योजनेत समाविष्ट आहे अशाच व्यक्तींना सदर योजनेअंतर्गत लाभ घेता येऊ शकतो.त्यामुळे आपले नाव योजनेत आहे का हे पाहणे आवश्यक असणार आहे. Ayushman card
याव्यतिरिक्त या योजनेत नवनवीन घटकांचा समावेश होत आहे जसे की, अलीकडेच महात्मा फुले जन आरोग्य योजना याचे एकत्रीकरण देखील pmjay प्रधान मंत्री जन आरोग्य योजने मध्ये केले आहे.यामुळे दोन्ही योजनांचा लाभ एकत्रित घेता येणार आहे.याव्यतिरिक्त देखील आत्ता जे नागरिक कार्ड बनवत आहे त्यांचे आभा कार्ड देखील या कार्डमध्ये च बनवले जात आहे यामुळे आभा नंबर देखील मिळत आहे.त्यामुळे जे आयुष्मान कार्ड बनवणार आहेत त्यांना वेगळे आभा कार्ड बनवण्याची आवश्यकता नाही.
आभा कार्ड विषयी सांगायचे म्हणजे या कार्डमुळे आपल्या आरोग्याचा सर्व डेटा आँनलाईन सेव राहतो व कोणी हॉस्पिटल मध्ये भरती झाले तर डॉक्टरांना आरोग्याची सर्व माहिती सहजपणे आँनलाईन मिळू शकते.यामुळे त्यांना उपचार करणे सोपे होऊ शकते.
योजनेत नाव आहे का कसे पहावे?
Pm Letter |
ज्या कुटुंबाचे या योजनेत नाव आहे त्यांना काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचे एक pm letter पोस्टाने आले असेल.काही जणांनी हे कार्ड आल्यानंतर आँनलाईन सीएससी सेंटर किव्वा ग्रामपंचायत मधे जाऊन गोल्डन कार्ड बनवून घेतले असेल.ज्यांनी बनविले नसेल त्यांनी बनवून घ्यावे.मात्र काहींचे असे कार्ड हरवले असेल किव्वा मिळाले नसेल तर त्यांनी येथे क्लिक करून आपला मोबाईल नंबर व OTP टाकून आपले राज्य,जिल्हा,तालुका व गाव निवडून एक यादी येईल यामध्ये आपले किव्वा कुटुंबातील सदस्यांचे नाव आहे का हे पहावे जर नाव असेल तर जवळच्या CSC Center किव्वा आपल्या ग्रामपंचायत मध्ये हे कार्ड घेऊन जाऊन सोबत आधार कार्ड घेऊन जावे यानंतर आपले आयुष्मान भारत योजना चे कार्ड बनविले जाईल. ayushman card
किव्वा ज्यांच्याकडे असे कार्ड नसेल त्यांनी आपले रेशन कार्ड घेऊन जावे जेणेकरून आपले कार्ड आँनलाईन बनवतात येईल मात्र त्यासाठी यादीत नाव असणे आवश्यक आहे.
👉एका मिसकॉल वर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाचा 👈
लाभ कसा मिळेल?
आपण जर आयुष्मान भारत योजनेचे पात्र लाभार्थी असाल,आपले योजनेत नाव असेल तर आपण जवळच्या CSC Center किव्वा ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आपले आधार कार्ड,रेशन कार्ड किव्वा पोस्टाने आलेले कार्ड,मोबाईल घेऊन जावे व गोल्डन कार्ड बनवण्यास सांगावे.यानंतर आपले कार्ड आँनलाईन बनवून काही दिवसात आपल्याला मिळेल. 'ayushman card'
जर कधी कोणी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाले तर सर्व सरकारी दवाखाने तसेच काही निवडक खाजगी रुग्णालये देखील हे कार्ड दाखवल्यानंतर 5 लाख रुपांपर्यंतचे कोणत्याही आजारावर ईलाज करतात.त्यासाठी रुग्णाला भरती करताना सदर हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेचे कार्ड चालते का याची माहिती घावी.
👉आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा 👈
नेहमी विचारले जाणारे प्रश्न:
1) नवीन कुटुंबाचे नाव जोडता येते का?
उत्तर: आयुष्मान भारत योजना pmjay या योजेअंतर्गत लाभार्थ्यांचा सर्व डाटा SECC 2011 या प्रणाली मधून गोळा केलेला आहे.यामुळे ज्या पात्र नागरिकांचे कार्ड तयार करायचे आहे त्यांची सर्व माहिती अगोदरच उपलब्ध माहिती मधून निवडावी लागते.तेथे नवीन नाव add करण्याचा पर्याय उपलब्ध नसतो.त्यामुळे जी लिस्ट शासनाकडून आली आहे त्याच कुटुंबाचे कार्ड बनवता येत.
2) कुटुंबातील इतर सदस्यांचे नाव आहे माझे नाही तरी कार्ड बनवता येईल का?
उत्तर: नाही,वरील सांगितल्याप्रमाणे च ज्या प्रकारे नवीन कुटुंब जोडता येत नाही त्याचप्रमाणे नवीन सदस्या चे कार्ड देखील बनवता येत नाही.
3) आयुष्मान कार्ड हरवले आहे पुन्हा काढता येऊ शकते का?
उत्तर: हो, कार्ड हरवल्यास पुन्हा काढता येऊ शकते मात्र हे कार्ड सुरुवातीला ज्या व्यक्तीकडे ऑनलाइन काढले आहे तोच व्यक्ती पुन्हा कार्ड डाउनलोड करून देऊ शकतो.
"ayushman card"
योजनेत नव्याने नाव समविष्ट करण्याबतची चुकीची माहिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते मात्र यामधे तथ्य नाही.
आयुष्मान भारत योजना किव्वा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेच्या लाभासाठी यादीत नाव असणे आवश्यक आहे.गरीब कुटुंबांना आजारांवर उपचार करण्यासाठी ही एक चांगली योजना आहे त्यामुळे ज्या कुटुंबाची नावे यादीत असतील व ज्यांनी अजून देखील आँनलाईन कार्ड बनविले नसतील त्यांनी जवळील CSC Center, ग्रामपंचायत आपले सरकार विभाग येथे जाऊन कार्ड बनवून घ्यावे.
जर सदर माहिती आपणास आवडली असेल तर ती इतरांना देखील शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी