शासकीय दाखले काढण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे: list of all required documents for students
list of all required documents for students
मित्रांनो आणि मैत्रिणींनो नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागलेले आहे. आता यापुढे आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे शैक्षणिक कामासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे गोळा करणे.
list of all required documents for students: |
कागदपत्रे जमा करताना ऑनलाईन सर्वर वरील आलेल्या लोड मुळे अनेक वेळ लागू शकतो, तसेच कोणत्या दाखल्यांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ती कागदपत्रे जुळवणे याबाबत देखील गोंधळ उडू शकतो. जर आपणास प्रमाणपत्रे काढण्यासारखी कोणकोणती कागदपत्रे ची आवश्यकता आहे याची माहिती असल्यास आपला गोंधळ निर्माण होणार नाही. तर आपण आज विविध शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे कोणती असतात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
list of all required documents for students
दाखल्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
1) जातीचा दाखला:
1) आधार कार्ड झेरॉक्स
2) रेशन कार्ड झेरॉक्स
3) तलाठी चौकशी अहवाल.
4) शाळा सोडलेला दाखला.
5) वडिलांचा, चुलत्यांचा किव्वा आजोबांचा शाळा सोडलेला दाखला झेरॉक्स. ओबीसीसाठी 1967 पूर्वीचा, एन टी साठी 1961 पूर्वीचा, दाखला तसेच एससी साठी १९५० पूर्वीचा दाखला आवश्यक आहे.
6) फोटो.
2) उत्पन्न दाखला एक वर्ष:
1) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड.
2) रेशन कार्ड झेरॉक्स.
3) तलाठी अहवाल
3) उत्पन्न दाखला तीन वर्ष:
1) आधार कार्ड.
2) तलाठी अहवाल.
3) रेशन कार्ड.
4) डोमासाईल सर्टिफिकेट:
1) आधार कार्ड.
2) रेशन कार्ड.
3) शाळा सोडलेला दाखला.
4) तलाठी रहिवासी दाखला.
5) फोटो.
list of all required documents for students
मिलिटरी मोफत ट्रेनिंग बाबत माहिती पहा
5) नॉन क्रिमीलेअर दाखला:
1) तीन वर्षाचा तहसील उत्पन्न दाखला.
2) शाळा सोडलेल्या दाखला.
3) आधार कार्ड.
4) जातीचा दाखला.
5) तलाठी चौकशी अहवाल.
6) रेशन कार्ड झेरॉक्स.
7) नोकरी करत असल्यास फॉर्म 16.
8) फोटो.
ओबीसी एससी एसटी या गटातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
documents for students
6) जात पडताळणी प्रमाणपत्र:
1) वारस हक्क प्रमाणपत्र.
2) जात वैधता प्रमाणपत्र.
3) जात प्रमाणपत्र.
4) सेवा वैधता प्रमाणपत्र.
5) प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला.
6) माध्यमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
7) महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र.
8) प्राथमिक शाळेचे प्रवेश घेतलेले रजिस्टर उतारा.
9) माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या रजिस्टर चा उतारा.
10) जन्म मृत्यू नोंदवही उतारा.
11) सातबारा उतारा.
12) राष्ट्रीयत्व नोंदवही चा उतारा.
12) नाव आडनाव यामध्ये बदल राजपत्र.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखल्याची आवश्यकता असते.
7) सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट:
1) स्टेट कास्ट सर्टिफिकेट.
2) एफिडेविट.
3) तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
4) शाळा सोडल्याचा दाखला.
5) वडिलांच्या शाळा सोडलेल्या दाखला.
6) कोतवाल नोंद वही चा उतारा.
मित्रांनो आपल्याला जर हि माहिती आवडली असेल तर आपण इतरांना देखील शेअर करू शकता.
तसेच आणखी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम च्या ग्रुप ला देखील जॉईन करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी