gopinath munde sanugrah anudan yojana 2023: या योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र शेतकरी राहतात वंचित जाणून घ्या सविस्तर माहिती
gopinath munde sanugrah anudan yojana 2023
गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना 2023
gopinath munde sanugrah anudan yojana 2023: या योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र शेतकरी राहतात वंचित. जाणून घ्या सविस्तर माहिती
बंधू-भगिनींनो नमस्कार ,लवकरच पावसाळा सुरू होत आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस झाला यामध्ये काही ठिकाणी शेतीमालाचे देखील नुकसान झाले. या कालावधी मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या स्वतः बरोबरच आपल्या मालाचे व जनावरांचे संरक्षण करावे असे आवाहन केले जाते. मात्र तरीदेखील बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या टाळता येणं अशक्य होते.या कारणामुळे जनावरांचे मृत्यू,शेतीचे नुकसान होते तसेच काही ठिकाणी शेतकऱ्याचे मृत्यू झाल्याचे देखील आपण पाहतो.
वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू अशा बातम्या आपल्याला सारख्या ऐकायला मिळतात.मात्र अशा घटना घडल्यानंतर त्या शेतकऱ्याचा कुटुंबास सहाय्य मिळणे आवश्यक असते. या विषयी आपण माहिती पाहणार आहोत
gopinath munde sanugrah anudan yojana 2023 |
gopinath munde sanugrah anudan yojana 2023
शेतकरी बंधूंनो १९ एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाकडून एक योजना बंद होऊन दुसरी योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच त्या योजनेला नवीन स्वरूप देण्यात आले आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना राज्यात 2015 -16 पासून राबविण्यात येत होती. पुन्हा २०१७ मध्ये त्यात काही बदल झाले. यापूर्वी काही ना काही कारणांमुळे शेतकऱ्यांचे अपघाता संबंधीचे दावे बाद केले जात असत, शेतकऱ्याचा मृत्यू झाला तरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसदारांना लाभ मिळत नसे.
यामध्ये विमा कंपन्या शासनाकडून पैसे घेत असत मात्र ते पैसे शेतकऱ्यांना मिळत नसत. एका ठराविक वेळेनंतर शेतकऱ्यांकडून पाठपुरावा पूर्ण होत नसे त्यामुळे विमा कंपन्या यामधे मालामाल होऊन पात्र शेतकरी वंचित राहिले जात होते.
gopinath munde sanugrah anudan yojana 2023
सन 2019/20 मध्ये जे शेतकरी मयत झाले होते त्यांचे दावे आत्ता निकाली काढले जात आहे त्यांना मदत मिळत आहे. हा लाभ मिळणे म्हणजे खूप मोठे काहीतरी मिळणे असे देखील नाही मात्र एखाद्या शेतकऱ्यावर असा दुर्दैवी प्रसंग जर आला तर त्याला मदत देणे हा प्रयत्न असतो. याच पार्श्वभूमीवर 19 एप्रिल 2023 रोजी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना असे नाव देण्यात आले आहे.
ही योजना पुढील तीन वर्ष चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या योजनेमध्ये जर काही बदल करण्यात आला असेल तर तो म्हणजे समजा पूर्वीच्या योजनेमध्ये शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्याला विमा कंपनी अंतर्गत लाभ घ्यावा लागत असे व त्यासाठी खूप हेलपाटे मारावे लागत प्रस्ताव देऊन पाठपुरावा करावा लागत असे.आता मात्र आता त्यात बदल करून तालुका लेव्हल वर एक या योजनेसंबंधी समिती गठित करण्यात आली आहे आणि या समितीच्या माध्यमातून योजना राबवली जात आहे
जर शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी गेला व त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, शेतकरी शेतात जात असताना त्याचा एखाद्या वाहनाने अपघात झाला असेल किंवा चालत जात असताना अपघात झाला असेल बैलगाडीत जात असेल व त्याचा अपघात झाला तरी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. रेल्वेने जरी अपघात झाला तरी देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो मात्र फक्त ती आत्महत्या नसावी.gopinath munde sanugrah anudan yojana 2023
gopinath munde sanugrah anudan yojana 2023
अनेक वेळा शेतकरी शेतात औषध फवारणी करायला जातात अशा वेळेस त्यांचा संपर्क त्या कीटकनाशकाचे येतो व शेतकऱ्याचा मृत्यू होतो अशा घटना आपण अनेक वेळा पाहिल्या देखील आहे अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो.
शेतकरी अनेक वेळा शेतात जात असताना शेताला पाणी देत असताना किंवा एखाद्या मालाची काढणी करत असताना चुकून विंचू किंवा सर्पदंश होतो यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे तर अशा वेळेस देखील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.तसेच बैलाने मारलं असेल.gopinath munde yojna
आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत अनेक वेळा शेतकऱ्यांचे शेतात माल असतात ते झाकण्यासाठी किंवा शेतात काम करत असताना अचानकपणे वीज अंगावर पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होतो मात्र त्यांचा यापूर्वीच्या म्हणजेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या अंतर्गत बऱ्याच जणांना लाभ मिळत नसत ते यामध्ये विमा कंपन्यांकडून बाद केले जात असत.
यासोबतच झाडावरून पडून झालेला मृत्य, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या.
gopinath munde sanugrah anudan yojana 2023
जर एखाद्या शेतकऱ्यास वाघ किंवा बिबट्या यांसारख्या जंगली प्राण्यांकडून हल्ला होऊन मृत्यू झाला असेल तर शासनाकडून त्या प्रकरणामध्ये वीस लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे.
कुत्रा किंवा रानडुक्कर या हे प्राणी जंगली प्राणी यामध्ये जरी येत नसले तरी समजा ते चावून एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तरी देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.
आजची माहिती शेतकरी बंधूना आवडली असल्यास इतरांसोबत देखील शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.
तसेच आणखी माहितीसाठी आमच्या टेलीग्राम च्या ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी