gas safety : गॅस वापरताना या महत्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
gas safety:
gas safety : गॅस वापरताना या 15 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
गॅस चे दर भरपूर प्रमाणत वाढले असले तरीदेखील शहरी भाग असूद्या नाहीतर ग्रामीण भाग स्वयंपाक करण्यासाठी जवळजवळ 99% लोक गॅस सिलेंडर चा वापर करत असतात.
गॅस हा वापरायला सोपा वाटत असला तरीदेखील तो अत्यंत घातक परिणाम करणारा आहे.गॅस हा अत्यंत ज्वलनशील असतो त्यामुळे तो वापरताना सुरक्षेच्या कारणास्तव त्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
आजच्या लेखामध्ये आपण गॅस सिलेंडर वापरताना gas safety खबरदारी या विषयी माहिती पाहणार आहोत.
gas safety |
घरातील स्वयंपाक असूद्या नाहीतर हॉटेल मधील सर्व ठिकाणी गॅस सिलेंडर हा वापरला जातोच.गॅस सिलेंडर पासून काही घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील.गॅस अत्यंत ज्वलनशील असल्या कारणाने तो वापरताना सतर्कतेने वापरणे आवश्यक असते.
काय दक्षता घ्यावी:
1) सिलेंडर घेताना त्याचे वजन चेक करणे हे जागृत ग्राहकाचे कर्तव्य तर आहेच मात्र त्यासोबतच तो लिकेज तर नाही ना, हे गॅस घेताना प्रत्येकवेळी गॅस विक्रेत्याकडून चेक करणे गरजेचे आहे.यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.gas safety
2) गॅस चा पाईप हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो कारण गॅस सप्लाय करण्याचे काम या पाईप मधून होते त्यामुळे हा पाईप वारंवार चेक केला पाहिजे तसेच तो चांगल्या प्रतीचा वापरावा.हा पाईप दर 3 वर्षांनी जरूर बदलावा कारण आपल्या जीवाची सुरक्षा ही महत्वाची आहे.
3) अनेक जणांच्या घरी जागेच्या अभावामुळे किचन हे छोटे असते त्यामुळे तेथे पुरेशी हवा खेळती नसते मात्र अशा किचन मध्ये काही घटना घडली हवेचा संपर्क येत नाही व गॅस सर्व किचन मध्ये लगेच पसरून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
4) सिलेंडर सर्व बाजूने पॅक होईल असा ठेवू नये. मॉड्युलर किचन मध्ये सिलेंडर हे कप्प्या मध्ये ठेवले जातात शक्यतो तसे करू नये.जरी कप्प्यामध्ये ठेवला तरी त्यास थोडी हवा मिळाली पाहिजे किव्वा एकदम जमिनीवर टाकी ठेऊ नये.स्टँड वर ठेवावे जेणेकरून त्यास थोडा स्पेस मिळेल.gas safety
5) सर्वांचे दुर्लक्ष होणारी गोष्ट म्हणजे सिलेंडर घेताना नेहमी त्यावरची एक्सपायरी डेट न पाहणे.शक्यतो सिलेंडर वर असणारी एक्सपायरी डेट पाहूनच तो घ्यावा जेणेकरून संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.
डेट चेक करण्यासाठी ABCD व पुढे वर्ष दिलेलं असत.म्हणजेच समजा A 2024 असे दिले असेल तर जानेवारी फेब्रुवारी मार्च 2024 या कालावधी मधे एक्सपायरी डेट संपली आहे.याचप्रमाणे B म्हणजे पुढील एप्रिल,मे,जून C म्हणजे जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर व D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर.हे पाहूनच सिलेंडर घ्यावा.
6) सिलेंडर हा नेहमी उभा ठेवावं,तो आडवा करून ठेऊ नये.
7) गॅस च्या बाजूला ज्वलनशील पदार्थ कधीच ठेऊ नये.बरेच जण तेलाचे डबे,रॉकेल ठेवत असतात मात्र जर गॅस
लीक झाला तर आग लगेच पसरते व नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
8) शक्य असल्यास इले्ट्रॉनिक्स वस्तू सिलेंडर शेजारी ठेऊ नयेत,तसेच इलेक्ट्रिक बोर्ड तेथे नसावेत.gas safety
9) बराच वेळा गरम भांडी ही पाईप च्या शेजारी ठेवली जातात यामुळे पाईप वितळण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे शक्यतो पाईप साठी कव्हर असावा.
10) अनेक वेळा नकळतणे दूध किव्वा कुकर मधील पदार्थ उतू जातात त्यामुळे बर्नर खराब होतात व जाळ व्यवस्थित चालत नाही. यामुळे देखील धोका होऊ शकतो.
11) लहान मुलांना गॅस सिलेंडर पासून दूर ठेवणे कधीही उत्तम.त्यांच्याकडून नकळतपणे गॅस शी संपर्क येतो त्यामुळे हानी होऊ शकते.
12) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर नेहमी रेग्यूलेटर बंद करावा.जेणेकरून कोणी किचन मध्ये नसले तरी कोणताही धोका होऊ शकत नाही. 'gas safety'
13) काही संशय वाटल्यास लगेच गॅस एजन्सी मधील अधिकृत कर्मचाऱ्याला बोलून तपासणी करून घ्यावी.दुर्लक्ष करून रिस्क घेऊ नये.
14) गॅस सिलेंडर किव्वा शेगडी मध्ये काही बिघाड वाटल्यास त्याविषयी माहिती नसल्यास तो स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये.
15) महिलांनी किचन मध्ये काम करत असताना शक्यतो सुती कपडे परिधान करावेत किव्वा अग्नी प्रतिरोधक अप्रोन वापरावे.
वरीलप्रमणे जर महिला भगिनींना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतल्यास नक्कीच अपघातापासून बचाव होऊ शकतो व होणाऱ्या गोष्टीपासून वाचता येऊ शकते. ''gas safety''
गॅस गळती झाल्यास काय करावे:
गॅस वापरताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहिले मात्र जर समजा गॅस लीकेज झाला तर काय करावे याची देखील माहिती आपणास माहिती हवी.
1) गॅस गळती झाल्यास सर्वप्रथम घरातील सर्व दारे खिडक्या उघडाव्या.
2) घरातील लाईट इलेक्ट्रिकल वस्तू सुरू करू नयेत.
3) मेणबत्ती,दिवा सुरू असेल तर तो त्वरित विझवावा.
4) रेग्यूलेटर लगेच बंद करा.
5) गॅस एजन्सी मध्ये त्वरित फोन करावा.
6) बाकीच्या गोष्टी सोडून आपला जीव कसा वाचेल या दृष्टीने त्या ठिकाणाहून दूर जावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी