chief minister relief fund: एका मिसकॉल वर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी
chief minister relief fund
chief minister relief fund:एका मिसकॉल वर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी
महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून विविध आजारांसाठी तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी chief minister relief fund मधून मदत दिली जाते याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
chief minister relief fund |
काय आहे योजना:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून तो मंत्रालयात सादर करावा लागत असत त्यानंतर तो निधी मिळत असत. मात्र यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना समस्या येत असत. या गोष्टीचा विचार करून राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबर वर केवळ एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेमुळे कमी वेळात व सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी लाभार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना कोणती प्रोसेस करावी लागेल हे पाहावे लागेल. chief minister relief fund
मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी लोकांना अर्ज भरताना खूप चुका होत असत त्यामुळे पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना याचा त्रास होत असे व वारंवार मंत्रालयाचे दरवाजे झीजवावे लागत होते.त्यामुळे आता थेट एका मिस कॉल वर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध झालेली आहे.
मुख्यमंत्री सहायक निधी मधून सर्वात जास्त कर्करोगावरील उपचारांसाठी अर्ज येतात हे अर्ज एकूण अर्जाच्या 25% इतके असतात त्यानंतर हृदयविकार गुडघा प्रत्यारोपण खुबा प्रत्यारोपण अपघात तसेच किडनीशी संबंधित डायलेसिस व उपचार या मदतीसाठी अर्ज सादर होत असतात या व्यतिरिक्त शॉक लागणे व भाजणे यावरील उपचारासाठी देखील अर्ज येत असतात.
जानेवारी मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लक्ष इतक्या प्रमाणात निधी दिला गेला.
फेब्रुवारी मध्ये 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख इतका सहायता निधी देण्यात आला.
मार्च मध्ये 1461 रुग्णांना 11 कोटी 95 लाख इतका सहायता निधी देण्यात आला.
तसेच एप्रिल या महिन्यात 1184 रुग्णांना 9 कोटी 93 लाख इतका मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी चे वितरण करण्यात आले आहे.
प्रक्रिया कशी करावी: chief minister relief fund
अर्जदाराने 8650567567 या मोबाईल नंबर वर एक मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर संबंधित अर्जाची लिंक एस एम एस द्वारे आपणास प्राप्त होईल या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक अर्ज डाऊनलोड होईल या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा लागणार आहे तसेच या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे pdf स्वरूपात स्कॅन करून ती cmrf.maharashtra.gov.in या मेल आयडी वर पाठवायचे आहेत.
chief minister relief fund
आवश्यक कागदपत्रे:
1) विहित नमुन्यातील अर्ज.
2) उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे प्रमाणीकरण ( खाजगी रुग्णालयासाठी सिव्हील सर्जन यांचे प्रमाणपत्र).
3) तहसीलदार उत्पादन दाखला ( 1.60 लाखाच्या आतील).
4) रुग्णाचे आधारकार्ड ( लहान बालकांसाठी आईचे आधारकार्ड).
5) रुग्णाचे रेशन कार्ड.
6) आजाराचे सर्व रिपोर्ट्स.
7) प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समिती मान्यता.
8) अपघात असल्यास FIR कॉपी.
धर्मादाय रुग्णालयातील मोफत उपचारांसाठी उत्पन्न मर्यादेत झाली वाढ
'chief minister relief fund'
मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी आता फक्त मिस कॉल देण्याची आवश्यकता असणार आहे एका मिस कॉल वर मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे मागील एक वर्षांमध्ये हजारो गरजूवंतांना या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे.
पूर्वी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी येणारे अर्ज हे अपूर्ण स्वरूपात असत त्यामुळे मदत करण्यास खूप अडचणी येत होत्या सध्या मिस कॉल वर सदर सुविधा उपलब्ध आहे तरी या प्रक्रियेसाठी एका ॲपची निर्मिती केली जाणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया अधिकच गतिमान होऊन एकाच वेळी सर्व अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क देखील साधावा लागणार नाही.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी 8650567567 या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
''chief minister relief fund''
वरील माहिती जर आपणास आवडली असेल तर ती इतरांसोबत देखील शेअर करू शकता
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अवश्य सामील व्हा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी