military bharti : मिलिटरी भरती मोफत ट्रेनिंग सोबतच 10,000 महिना मिळणार असा करा अर्ज.
military bharti:
military:
mahajyoti:
military bharati traning 2023
मिलिटरी भरती मोफत ट्रेनिंग सोबतच 10,000 महिना मिळणार असा करा अर्ज:
मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार, अनेक तरुण तरुणींचे भारतीय सैन्यदलात जाण्याचे स्वप्न असते मात्र काही कारणाने ते पूर्ण करण्यास अडचणी येत असतात.तरुणांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यानंतर नक्कीच ते भरती साठी प्रयत्न करतात.
याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती अंतर्गत मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 24 साठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे. नक्की काय योजना आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
military bharti |
मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना व विद्यार्थ्यांना या वर्षांमध्ये भरतीच्या पूर्वतयारीसाठी ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.military bharti
या प्रशिक्षणाच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी एकूण 1500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण मोफत तर आहेच व त्यासोबतच विद्या वेतन म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दरमहा 10000 रुपये मिळणार आहे मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. या विद्या वेतनाशिवाय विद्यार्थ्यांना आकस्मित निधी म्हणून 12,000 रुपये मिळणार आहे हा निधी एक वेळ असणार आहे.
या मिलिटरी भरती चे ट्रेनिंग महाज्योती कडून आहे याचे सेंटर हे पुणे येथे आहे.
मंजूर विद्यार्थी 1500
कालावधी 6 महिने
विद्यावेतन 10,000 दरमहा (75% उपस्थिती अनिवार्य)
आकस्मित निधी 12,000 ( एकदा)
पात्रता:
1) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. military bharti
2) विद्यार्थी इतर मागासवर्ग,भटक्या जाती जमाती,विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग या पैकी एक असावा.
3) विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
4) विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण असावा किव्वा त्याने 12 वी मध्ये प्रवेश घेतलेला असावा. "military bharti"
5) सदर विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या इतर योजनांचा कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसावा तसे झाल्यास त्याचा अर्ज बाद केला जाईल.
6) विद्यार्थ्यांची अंतिम निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
7) विद्यार्थ्याचे वय 17 वर्ष ते 21 वर्षे यामध्ये असावे.
वैद्यकीय पात्रता: military
उंची - मुलांसाठी कमीत कमी उंची 157 से.मी.असावी.
मुलींसाठी कमीत कमी उंची 152 से.मी.असावी.
छाती- छाती कमीत कमी 77 से.मी.असावी व दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से.मी.असावी.( फक्त मुलांसाठी)
इतर वैद्यकीय पात्रता:
1) विद्यार्थ्याचे शरीर मजबूत असावे त्यासोबतच त्याचे मानसिक आरोग्य देखील चांगले असावे.military
2) छाती कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित स्वरूपाची असावी.
3) दोन्ही कानाने व्यवस्थित ऐकायला आले पाहिजे.
4) डोळ्याची दृष्टी चांगली असायला हवी.
5) दात हिरड्या मजबूत असाव्या.
6) हाडांशी संबंधित आजार तसेच मुळव्याध यांसारखे आजार नसावेत. "military"
7) लाल हिरवा रंग ओळखता यावा.
महाराष्ट्र शासनाच्या सरकारी भरती ची माहिती इथे क्लीक करून अवश्य पहा
निवड प्रक्रिया:
1) उमेदवाराने महाज्योती च्या www.mahajyoti.org.in या संकेस्थळावर आँनलाईन अर्ज करावा.
2) प्राप्त अर्जाची छाननी होऊन चाळणी परीक्षा घेतली जाईल.
3) चाळणी परीक्षेतील प्राप्त गुणांनुसार व आरक्षित प्रमाणानुसार पात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.
प्रशिक्षणाचे स्वरूप:
1) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे असेल.
2) प्रशिक्षण हे अनिवासी पद्धतीचे असेल.
3) प्रशिक्षण हे सहा महिन्याचे असेल.
4) मिलिटरी भरती पूर्व परीक्षा त्यासोबत लेखी व शारीरिक प्रशिक्षण सुधारित अभ्यास क्रमानुसार देण्यात येईल.
आरक्षण पद्धत:
1) ओबीसी साठी 59% म्हणजेच 885 विद्यार्थी .
2) VJ-A साठी 10% म्हणजेच 150 विद्यार्थी.
3) NT -B साठी 8% म्हणजेच 120 विद्यार्थी.
4) NT- C साठी 11% म्हणजेच 165 विद्यार्थी.
5) NT- D साठी 6% म्हणजेच 90 विद्यार्थी.
6) SBC साठी 6% म्हणजेच 90 विद्यार्थी.
यासोबतच अनाथांसाठी 1 % जागा आरक्षित असेल.
प्रवर्गणीहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असेल.
military bharati traning 2023
आवश्यक कागदपत्रे:
1) डोमासाईल सर्टिफिकेट.
2) कास्ट सर्टिफिकेट.
3) नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट.
4) आधार कार्ड लिंक असलेले पासबुक.
5) अनाथ असल्यास त्याबाबत चा दाखला.
6) आधार कार्ड.
अर्ज करण्याची पद्धत:
www.mahajyoti.org.in या वेबसाईट वर जाऊन notice board या बटणावरील Aplication for military bharati 2023- 24 traning यावर क्लिक सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून करून सर्व माहिती भरावी.
मित्रांनो आपण महाज्योती च्या मिलिटरी भरती संबंधी संपूर्ण माहिती पहिली आहे,माहिती आवडल्यास इतरांना देखील अवश्य शेअर करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी