maharashtra recrutment: पशुसंवर्धन विभागातील भरती ची सर्व प्रक्रिया सविस्तर पहा.

maharashtra recrutment:

maharashtra job vacancy 2023:


पशुसंवर्धन विभागातील भरती ची सर्व प्रक्रिया सविस्तर पहा.

मित्रांनो,पशुसंवर्धन विभागातील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या गट क मधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.याची सर्व प्रक्रिया पाहूयात.
maharashtra recrutment
maharashtra recrutment


निवड प्रक्रिया:

1) परीक्षा संगणक प्रणाली द्वारे फक्त मराठी भाषेतूनच घेण्यात येईल. परीक्षा जिल्ह्याच्या मुख्यालय घेण्यात येणार आहे.

2) ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल निवड होण्यासाठी उमेदवाराला किमान 45 टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. maharashtra recrutment

3) ऑनलाइन परीक्षा मध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे व त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे.

4) परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील ज्या पदांसाठी शारीरिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदांच्या उमेदवारांची निवड करताना ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य या विषयांकरिता 50 गुण असेल व एकूण 200 गुण असणार आहे.

5) ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी गरजेची आहे, अशा पदांच्या उमेदवारांची निवड करत असताना ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान या विषयांकरता प्रत्येकी 30 गुण व एकूण 120 गुणांचे परीक्षा असणार आहे.
तसेच शारीरिक व व्यावसायिक चाचणी 80 गुणांची असणार आहे त्यासाठी दोन तासांचा कालावधी राहील.

6) संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षेसाठी पुढील प्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे: 
लिपिक वर्गीय पदे - लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी मराठी 50,इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, व बौद्धिक चाचणी 50 असे मिळून एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. maharashtra recrutment

तांत्रिक पदे - प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तारतंत्री, बाष्पक परिचर या पदांसाठी देखील एकूण 200 गुणाची लेखी परीक्षा राहील मात्र मराठी, इंग्रजी,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येकी 30 गुण राहतील व संबंधित पदाच्या तांत्रिक विषयासाठी 80 गुण राहतील.


परीक्षा शुल्क : 

1) अमागास वर्गासाठी परीक्षा शुल्क 1000.
2) मागासवर्गीय, दीव्यांग,अनाथ, माजी सैनिक व आर्थिक दुर्बल घटक यासाठी 10% सवलत नुसार 900 रुपये शुल्क राहील.
3) परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. "maharashtra recrutment"


अर्ज करण्याची प्रक्रिया: 

1) सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

2) ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर दिनांक 27 मे 2023 पासून 11 जून 2023 पर्यंत भरणे आवश्यक आहे.

3) अर्ज सादर केल्यानंतर शुल्क भरल्याशिवाय उमेदवारास परीक्षा देता येणार नाही.


अर्ज भरताना घ्यावयाची काळजी:

1) https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावरच ऑनलाईन अर्ज भरावा तसेच परीक्षा शुल्क भरण्यासाठी देखील 27 मे ते 11 जून रात्री 11:59  पर्यंत चा कालावधी असणार आहे.नंतर साईट बंद होईल.

2) उमेदवाराने अर्ज भरताना विचारपूर्वक सर्व माहिती भरणे आवश्यक आहे तसेच संपूर्णपणे खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरताना काही चुका झाल्याच्या कारणाने जर अर्ज नाकारला गेला तर, त्याची सर्वस्व जबाबदारी ही उमेदवाराची असणार आहे. व त्यानंतर उमेदवारस तक्रार करता येणार नाही तसेच एकदा भरलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही.  recrutment

3) ऑनलाइन परीक्षा ही उमेदवारांच्या त्यांनी भरलेल्या माहितीप्रमाणे होणार आहे यामध्ये पूर्वछाननी न करता परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे सदर परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीचे हक्क राहणार नाहीत मात्र कागदपत्रांच्या पूर्ण तपासणीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल व गृहीत पात्रतेनुसार यादी प्रसिद्ध करून उमेदवाराच्या कागदपत्रांची संपूर्ण छाननी करून उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.

4) परीक्षा सुरू असताना मोबाईल, कॅल्क्युलेटर व इतर इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास मनाई आहे.

5) उमेदवारांचा अंतिम निकाल संबंधित विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाहीर होईल.

टिप्पण्या