maharashtra job vacancy 2023: पशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी उपलब्ध.

 maharashtra job vacancy 2023:

maharashtra recrutment : 

पशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी उपलब्ध

मित्रांनो नमस्कार, पशुसंवर्धन विभागातील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या गट क मधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
एकूण पदे किती आहेत तसेच कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी पात्रता,वयोमर्यादा व वेतन   या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो 446 एकूण पदांसाठी ही भरती होणार असून 8 पदांमध्ये याचे विभाजन केले जाणार आहे तर पाहूयात पद व त्यासाठी किती जागा आहेत.तसेच त्यासाठी काय पात्रता असणार आहे.

maharashtra job vacancy 2023
 maharashtra job vacancy 2023


1) पशुधन पर्यवेक्षक गट क:

या पदासाठी एकूण 376 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता: 
1) या पदासाठी उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
2) पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.

                   किव्वा
तंत्रशिक्षण परीक्षा मंडळातर्फे किंवा संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यांमधील समतुल्य विद्यापीठांतर्गत दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन किंवा पशु संवर्धन पदविका अभ्यासक्रम केलेला असावा व त्यात उत्तीर्ण असावा.

               किव्वा
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत दोन वर्षांचा पशुधन व्यवसाय व दूध उत्पादन पदविका अभ्यासक्रम झालेला असावा.

             किव्वा
संविधानिक कृषी विद्यापीठ किंवा बी व्ही एस सी अँड ऍनिमल हजबंड्री ही पदविका प्राप्त केलेली असावी.
 
वेतन श्रेणी 25500- 81100

 maharashtra job vacancy 2023

2) वरिष्ठ लिपिक :

या पदासाठी एकूण 44 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता: 
 वरिष्ठ लिपिक: सांवीधिक विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असावी.
वेतन श्रेणी 25500- 81100

3) लघु लेखक: 

उच्च श्रेणीतील या पदासाठी एकूण 2 जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता: 
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आवश्यक.
2) मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द,इंग्रजी 40 शब्द v लघु लेखनाचा स्पीड हा 120 शब्द प्रती मिनिट असावा. तसेच याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असावे.  maharashtra job vacancy 2023
वेतन श्रेणी 41800 - 132300

4) लघु लेखक: 

निम्न श्रेणी मधील या पदासाठी एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: 
या पदासाठी देखील 
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आवश्यक.
2) मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द,इंग्रजी 40 शब्द v लघु लेखनाचा स्पीड हा 120 शब्द प्रती मिनिट असावा. तसेच याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
वेतन श्रेणी 38600 - 122800 


5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ:

गट क मधील या संवर्गात एकूण 4 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:  "maharashtra job vacancy 2023"
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 
1)भौतिकशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र रसायनशास्त्र या मुख्य विषयांसह विज्ञान शाखेतून पदवीधारक असावा.
2) संविधीक विद्यापीठाद्वारे किव्वा हापकाईन बायो फार्मास्यूटीकल कॉर्पोरशन मुंबई अंतर्गत डिप्लोमा केलेला असावा.
वेतन श्रेणी 35400 - 112400 

6) तारतंत्री: 

तारतंत्री या गट क मधील पदासाठी एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:  job vacancy 2023
1) आय. टी.आय किव्वा इतर मान्यता असलेल्या संस्थेमधून संबंधित ट्रेड चे प्रमाणपत्र.
2) विद्युत उकरणांचा दुरुस्ती बाबत 1 वर्षाचा अनुभव असावा.
वेतन श्रेणी 19900 - 63200


7) यांत्रिकी: 

गट क च्या या पदासाठी एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: 
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला हवे.
2) आय. टी.आय मध्ये डिझेल मेकॅनिक हा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असावे.
3) संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव.
वेतन श्रेणी 19900 - 63200

8) बाष्पक परिचर:

गट क मधील या संवर्गा मध्ये एकूण 2 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:    job vacancy 2023
1) बाष्पक परिचर नियम 2011 नुसार ब किंवा क चे प्रमाणपत्र आवश्यक.
2) शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3) महाराष्ट्र बाष्पके धुराचा उपद्रव या संस्थेमधून किंवा इतर शासन मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक.
4) तापमानाची नोंद ठेवण्यास उमेदवार सक्षम असणे आवश्यक.
वेतन श्रेणी  19900 - 63200

वयोमर्यादा:

1) सदर पदांसाठी ची वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्ष यापेक्षा जास्त नसावे 
2) उमेदवाराचे वय 1 मे 2023 या तारखेनुसार ठरवण्यात येईल.
3) मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षा सवलत
4) दिव्यांग उमेदवारास 7 वर्षे सवलत.
5) खेळाडूंना 5 वर्षे सवलत.


                                          maharashtra job vacancy 2023





टिप्पण्या