krushi sinchan yojana: ठिबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान.

 krushi sinchan yojana:

krushi sinchan yojana: ठिबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान.

krushi sinchan yojana
krushi sinchan yojana 


आज देखील 80 टक्के शेतकरी शेतीला पाणी देत असताना पारंपारिक पद्धतीचा अवलंब करत आहेत म्हणजेच पाणी देताना ते पाटाने पाणी सोडले जाते मात्र या पद्धतीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात लागते व त्याचा अपपव्य देखील होतो. तसेच बऱ्याच पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिले जाते.तसेच त्यामुळे वेळ देखील खर्चिक होतो.बऱ्याच भागांमध्ये पाण्याची कमतरता देखील असल्याकारणाने संपूर्ण शेती ओलिताखाली येत नाही.

ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा: krushi sinchan yojana 

याच कारणामुळे शेतीसाठी पाणी देताना आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून ठिबक सिंचन याकडे पाहता येईल ठिबक सिंचन केल्यामुळे पाणी हे पिकाच्या आवश्यकतेनुसार मिळते त्याचा अपव्य होत नाही तसेच जमिनीमध्ये गारवा निर्माण होतो व पिकांची चांगली वाढ होऊन पिक जोमात येते.

ठिबक सिंचनामुळे नळीद्वारे थेंब थेंब पाणी पिकांच्या मुळाशी जाऊन पाणी माती व हवा यांचा नेहमी समन्वय साधला जाऊन पिकाच्या वाढीस मदत होते तसेच पाण्याचा वेग हा कमी प्रमाणात असल्यामुळे ते मुळाशी जिरते व पिकाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात येते. krushi sinchan yojana


मात्र ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खर्च होत असतो जसे की, त्यासाठी लागणारे पाईप, नोझल, स्पिंकलर, लेटरल इत्यादी गोष्टींसाठी भरपूर खर्च होतो मात्र त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे भांडवल उपलब्ध असेलच असे नाही.मात्र महाराष्ट्र शासनातर्फे शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे व भविष्यात देखील याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.



कीती मिळेल अनुदान: krushi sinchan yojana

या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी यांना 55 टक्के अनुदान देण्यात येणार आहे तसेच जे इतर शेतकरी असतील त्यांना 45 टक्के अनुदान दिले जाणार आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी 25 टक्के ते 30 टक्के या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच जवळजवळ 80 टक्के पर्यत अनुदान शेतकऱ्यांना योजना मार्फत मिळणार आहे.

म्हणजेच अल्पभूधारक जे शेतकरी असतील त्यांना 80% व इतर शेतकरी यांना ७५% अनुदान शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत मिळणार आहे.

यामध्ये केंद्राचा 60 टक्के हिस्सा व राज्याचा 40% हिस्सा असणार आहे व हे अनुदान जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादा पर्यंत देण्यात येणार आहे. "krushi sinchan yojana"



प्रकारानुसार किती अनुदान मिळेल हे पाहुयात:

1) लॅटरल अंतर हे 1.2*0.6 मीटर असेल तर त्याची खर्च मर्यादा ही 127501 इतकी असेल तर त्यासाठी अल्पभूसबधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान हे 109000 इतके असेल. व इतर शेतकऱ्यांसाठी ते 75 टक्के अनुदान म्हणजेच 95600 इतके असेल.sinchan yojana


2) अंतर हे 1.5*1.5 इतके असल्यास त्याचे खर्चाची मर्यादा आहे 97200 की असेल तर यातील 80 टक्के अनुदान अल्पभूधारक शेतकरी यांना 77900 इतके मिळेल तर इतर शेतकऱ्यांना 75 टक्के याप्रमाणे ते 72900 इतके मिळेल.


3) जर अंतर हे 5*5 इतके असेल तर त्याची खर्च मर्यादा आहे 31000 की असेल व त्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान 25400 इतके असेल त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना ते 23800 इतके असेल.


अर्ज कसा करावा:

या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना लाभ घायचा आहे त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज भरु शकता तसेच तुम्ही स्वतः देखील mahadbt.maharashtra या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.



शेतीविषयी आणखी माहितीसाठी आमच्या संकेतस्थळास अवश्य भेट दया.

टिप्पण्या