apghat vima yojana: या अपघात योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घेता येणारा 2 लाखांपर्यंत लाभ.

 apghat vima yojana:

apghat vima yojana: या अपघात योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घेता येणारा 2 लाखांपर्यंत लाभ.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना:


शेती हा व्यवसाय अनेक अडचणींना सामोरे जाऊन करावा लागतो यामध्ये शेतकऱ्यांसोबत अनेक अपघात घडतात त्याचप्रमाणे बराच वेळा रात्रीची वीज असते त्यामुळे अनेक धोके उद्भवत असतात. मात्र यानंतर  शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अपंगत्व येते, तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त होते व कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न साधन पूर्णपणे बंद होते व त्या कुटुंबावर आर्थिक अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.त्याबाबतचा सुधारित शासन निर्णय हा 19 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आला.

यापूर्वीच्या या योजनेअंतर्गत बऱ्याच ठिकाणी विमा कंपन्यांमार्फत वेळेत दावे मंजूर न केल्यामुळे तसेच अनावश्यक त्रुटी काढल्यामुळे विमा प्रकरणे नाकारले गेल्याचे शासनाच्या निदर्शक आले होते. त्याबाबत योग्य कार्यवाही करून विमा कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा न झाल्याचे दिसून आले, त्यामुळे या योजनेचा हेतू साध्य होत नाही. त्यामुळे या योजनेमध्ये बदल करून "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" दिनांक 17 मार्च 2023 रोजीच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये यास मान्यता दिली गेली.

शेतकरी बांधवांनो "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" या योजनेला मंजुरी मिळालेली आहे. मात्र अनेकदा या योजनेची माहिती शेतकरी बांधवांना माहिती नसते त्यामुळे अनेक शेतकरी बांधव अशा योजनेपासून वंचित राहतात.तर या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत तसेच या योजनेचा फायदा कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो व या अंतर्गत लाभार्थ्यांना किती लाभ मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण आज पाहूयात.apghat vima yojana
apghat vima yojana
apghat vima yojana



काय आहे योजना:

शेती करताना शेतकऱ्याचा पाण्याची संपर्क येतो अशा वेळेस पाण्यात बुडून मृत्यू होणे तसेच शेती करताना औषध फवारणी ही करावीच लागते अशा वेळेत जर त्या कीटकनाशकाचा संपर्क शेतकऱ्यास झाला तर विषबाधा होते त्यामुळे मृत्यू देखील वाढवू शकतो. त्याचप्रमाणे विजेचा धक्का लागून मृत्यू होणे किंवा वीज अंगावर पडणे, उंचावरून पडलेला अपघात, शेती करताना अनेक वेळा रात्रीची वीज असते त्यामुळे त्या शेतकऱ्यास विंचू किंवा सर्पदंश झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकलेले असतात किंवा काही भागांमध्ये अनेक जंगली जनावरे हे येत असतात त्यांच्यामार्फत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकले असेल. याव्यतिरिक्त दंगल होणे व इतर अन्य कोणत्याही अपघात यामुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.

या सुधारित योजनेनुसार ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे त्याच्या कुटुंबास मदत देण्याकरिता संबंधित शेतकरी व त्याच्या कुटुंबातील नोंद नसलेला एक सदस्य म्हणजेच त्याचे आई-वडील किंवा शेतकऱ्याची पती-पत्नी किंवा मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे मिळून कुटुंबातील दोघेजण"गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना"योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास शासनाकडून 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येते.apghat vima yojana


लाभ किती मिळेल:

1) सदर अपघात झाल्याकारणाने संबंधी शेतकऱ्याचा कोणताही एक अवयव जसे की एक डोळा एक हात किंवा एक पाय रिकामी झाला असेल तर त्या शेतकऱ्यास 1 लाख रुपये इतका लाभ मिळेल."apghat vima yojana"
2) संबंधित शेतकऱ्याचा एक डोळा एक हात किंवा पाय रिकामी झाला असेल तर त्या शेतकऱ्यास 2 लाख रुपये लाभ मिळू शकतो.
3) जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय कमी झाले असतील तर त्या शेतकऱ्यास 2 लाख इतके अनुदान मिळेल.vima yojana
4) जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला असेल तर त्या शेतकऱ्याच्या वारसदारांना 2 लाख इतके अनुदान मिळेल.


नियम व अटी:

1) या योजनेअंतर्गत खातेधारक शेतकरी तसेच नोंद नसलेला कुटुंबातील इतर सदस्य यांच्यापैकी कोणालाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
2) जर सदर अपघातग्रस्त शेतकरी व अन्य लाभधारक सदस्य यापैकी कोणी शासनाच्या अन्य अपघात योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास तर या योजनेसाठी पात्र असणार नाही.
3) योजनेअंतर्गत जनावरांच्या हल्ल्यामुळे,वीज पडून मृत्यू,सर्पदंश,विंचू कीटकनाशकाच्या वापरामुळे झालेला मृत्यू, रेल्वे किव्वा रस्ता अपघात, नक्षल, बाळंत पणातील मृत्यू
4) या योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू,विम्याच्या पूर्वीचे अपंगत्व,आत्महत्या किव्वा आत्महत्येचा प्रयत्न, कायद्याचे उल्लंघन,रक्तस्त्राव,शर्यतीतील अपघात,युद्ध,जवळच्या व्यक्ती कडून खून  इत्यादी मध्ये लाभ घेता येत नाही.

आवश्यक कागदपत्रे:

1) शेतकऱ्याचा मृत्यू चा दाखला.
2) सात बारा उतारा.
3) तलाठ्याकडील वारसाची नोंद बाबत नमुना नंबर 6.
4) वयाच्या पडताळणी बाबत शाळा सोडलेचा दाखला किव्वा आधार कार्ड,किव्वा मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक.
5) घटनास्थळ येथील पंचनामा तसेच पोलिस पाटील अहवाल.


हि महत्वाची योजना देखील पहा शेतकरी अनुदान योजना 

अपघाताच्या प्रकारानुसार सादर करायची कागदपत्रे: 

1) रस्ता किंवा रेल्वे अपघात: पोस्टमार्टम अहवाल पंचनामा अहवाल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
2) पाण्यात बुडून मृत्यू अपघात: पंचनामा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्ट, पाण्यात पेपर झाल्यास प्रथम अहवाल.
3) विषबाधा अपघात: पंचनामा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्ट रासायनिक विश्लेषण अहवाल इत्यादी.
4) विजेचा शॉक: पंचनामा अहवाल व पोस्टमार्टम रिपोर्ट.
5) वीज पडून झालेला अपघात: पंचनामा तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट.
6) विंचू किंवा सर्प दंशामार्फत झालेला अपघात: पोस्टमार्टम रिपोर्ट पंचनामा अहवाल तसेच जर उपचारा आधीच मृत झाले असल्यास यातून सूट मिळते मात्र तसा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
7) जनावरांच्या मुळे झालेला अपघात किंवा मृत्यू: पंचनामा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्ट तसेच बंधपत्र.
8) बाळंतपणातील मृत्यू: आरोग्य केंद्र मधून वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
9) अपघातामध्ये अपंग तो आल्यास: प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा जिल्हा चिकिस्तक यांचे कायम अपंगत्व बाबतचे प्रमाणपत्र.
"गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना"

लाभ कसा घेता येईल:
1) जेव्हा एखादे प्रकरण समोर येईल तेव्हापासून 30 दिवसाच्या आत मध्ये संबंधित शेतकरी अथवा त्यांचे वारसदार यांनी सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे.
2) संबंधित प्रकरणाची माहिती प्राप्त झाल्यानंतर महसूल अधिकारी तालुका कृषी अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांच्या मार्फत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित घटनेचा संपूर्ण अहवाल तहसीलदार यांना आठ दिवसाच्या आत मध्ये सादर करण्यात येईल.
3) तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 30 दिवसाच्या आत मध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत ग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या वारसदारांना त्यांच्या बँक खाते द्वारे लाभ देण्यात येईल.



शेतीविषयक व इतर महत्वाच्या योजनेच्या माहितीसाठी आमच्या संकेतस्थळास अवश्य भेट द्या 

टिप्पण्या