dharmaday hospital: धर्मादाय रुग्णालयातील मोफत उपचारांसाठी उत्पन मर्यादेत झाली वाढ

dharmaday hospital: धर्मादाय रुग्णालयातील मोफत उपचारांसाठी उत्पन मर्यादेत झाली वाढ 

पूर्वी धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेण्यासाठी पूर्वी ८५ हजाराची अट होती ती मर्यादा आता १ लाख ८० हजार इतकी झाली आहे तसेच बिलामध्ये ५०% सवलत मिळणेसाठी ची उत्पन मर्यादा हि १ लाख ६० हजार पेक्षा कमी होती आता हि मर्यादा वाढून ३ लाख ८० हजार इतकी झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे याचा लाभ अनेक रुग्णांना घेता येणार आहे.

अनेक धर्मादाय रुग्णालयांमध्ये उत्पादनाचे निकष पूर्ण होत नसलेमुळे खूप गरजू रुग्ण लाभापासून वंचित राहत होते आता या नवीन निर्णयामुळे याचा लाभ बहुसंख्य रुंगांना घेता येणार आहे.

नक्की योजना काय आहे पाहू -

धर्मादाय रुण्यालायामधील एकूण क्षमतेच्या १०% बेड हे धनहीन रुग्णासाठी राखीव असतात त्याचप्रमाणे आर्थिक मागास घटकासाठी देखील १०% बेड हे राखीव ठेवणे गरजेचे असते.त्यातील धनहीन रुग्णाचा मोफत इलाज तर आर्थिक मागास घटकांसाठी ५०% बिलात सवलत देणे बंधनकारक आहे.

धर्मादाय हॉस्पिटल ची यादी पहा 

आवश्यक कागदपत्रे:

1) रेशन कार्ड

2) तहसीलदार उत्पन्न दाखला

3) दारिद्र रेषेखालील दाखला

टिप्पण्या