SBIF Asha Scholarship Program 2024: मिळवा 7.5 लाखापर्यंत शिष्यवृत्ती


SBIF Asha Scholarship Program 2024:

या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड  झालेल्या विद्यार्थ्यांना  मिळणार 7.5 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप 

 

 

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक नामांकित बँक आहे. बँकिंग क्षेत्राच्या पलीकडे देखील या बँकेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात जसे की समाजातील वंचित घटक सुधारण्यासाठी योगदान देणे, आरोग्यसेवा, क्रीडा सेवा त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील या बँकेअंतर्गत महत्त्वपूर्ण असे उपक्रम राबविले जातात. SBIF Asha Scholarship Program 2024 या उपक्रमाविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करूयात.

एसबीआय बँक 'एसबीआय फाउंडेशन' साठी सी एस आर फंड उपलब्ध करून देते हे फाउंडेशन भारतातील 28 पेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत असून यामध्ये अनेक योजना राबविल्या जातात. आज आपण शैक्षणिक योजना व त्यासाठी दिली जाणारी स्कॉलरशिप याविषयी माहिती पाहत आहोत.

ही स्कॉलरशिप अगदी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते आयआयएम च्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्कॉलरशिप अंतर्गत 7.5 लाखांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते यामध्ये प्रामुख्याने पाच प्रकार केलेले आहे ते खालील प्रमाणे.

    

SBIF Asha Scholarship Program 2024
SBIF Asha Scholarship Program 2024



1) SBIF Asha Scholarship Program For School Students( शालेय विद्यार्थ्यांसाठी ची स्कॉलरशिप):

पात्रता:

 1) अर्जदार विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.

2) अर्ज करणारा विद्यार्थी हा इयत्ता 6 ते 12 या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण घेत असावा.

3) सदर विद्यार्थ्याला मागील वर्षांमध्ये 75 टक्के मार्क मिळवणे अपेक्षित आहे.

4) त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख च्या आत मध्ये असावे.

 

आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड

2) पासपोर्ट साईज फोटो

3) उत्पन्नाचा दाखला

4) मागील वर्षाचे मार्कशीट

5) चालू वर्षात प्रवेश घेतलेली पावती SBIF Asha Scholarship Program 2024

6) चालू वर्षातील प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळेतील ओळखपत्र यापैकी एक

7) स्वतः विद्यार्थी किंवा पालकांचा बँकेचा तपशील.

 

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रकिया ही ऑनलाईन स्वरूपाची असेल त्यासाठी आपणास buddy4study या website वर जावे लागेल.

पुढे आपणास registar apply now हे दोन पर्याय दिसतील.जर आपण पाहिले आपले खाते बनविले असेल तर डायरेक्ट apply करू शकता किव्वा रजिस्टर वर क्लिक करुन आपले नाव,ईमेल आयडी,मोबाईल क्रमांक,टाकून पासवर्ड तयार करावा.

एकदा आपले खाते तयार झाल्यावर start application करून समोर दिसत असलेली सर्व माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.

त्यांनतर अर्ज सबमिट करावा.

 

अंतिम दिनांक:

सदर शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 असणार आहे.यामधे थोडाफार बदल होऊ शकतो.

 

शिष्यवृत्ती रक्कम:

शालेय विद्यार्थी 6 ते 12 यासाठी प्रोत्साहनपर मिळणारी शिष्यवृत्ती ही 15000 असणार आहे.

 

एकूण कोट्यापैकी 50% शिष्यवृत्ती ही मुलींसाठी राखीव असेल.

तसेच अनुसूचित जाती असेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

 

2) SBIF Asha Scholarship Program For undergraduate students ( पदवीपूर्व शिष्यवृत्ती):

पात्रता: Asha Scholarship Program 2024

1) अर्जदार विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.

2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे.

3) शासनाने सूचीबद्ध केलेल्या विद्यापीठ किव्वा महाविद्यालयात विद्यार्थी हा पदवीपूर्व शिक्षण घेत असावा.

4) मागील वर्षात कमीत कमी 75 टक्के मार्क मिळवणे आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड

2) मागील वर्षीची गुण पत्रिका

3) चालू वर्षात प्रवेश घेतलेली पावती

4) चालू वर्षात शिकत असलेबाबातचे बोनाफाईड सर्टिफिकेट,ओळखपत्र किव्वा प्रवेश पत्र यापैकी एक.

5) स्वतःचे किव्वा पालकांचे बँक डिटेल्स.

6) जातीचा दाखला

 

अर्ज भरण्याची प्रक्रिया:

विद्यार्थ्यांनी apply now येथे क्लिक करून वरीलप्रमाणे  रजिस्टर करावे व सर्व माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत व submit करावे.

अंतिम मुदत: 31 ऑक्टोबर.

 

शिष्यवृत्ती रक्कम: 50,000 पर्यंत.

 

3) SBIF Asha Scholarship Program For postgraduate students ( पदव्युत्तर विदयार्थी शिष्यवृत्ती):

पात्रता:

1) अर्जदार विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.

2) अर्जदार विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय यामध्ये पदवीत्तर शिक्षण घेत असावा.

3) विद्यार्थ्याने मागील वर्षांमध्ये कमीत कमी 75 टक्के मार्क मिळवणे गरजेचे आहे.

4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे.Asha Scholarship Program 2024

 

आवश्यक कागदपत्रे:

1) विद्यार्थ्याचे आधार कार्ड

2) मागील वर्षीची मार्कशीट

3) चालू वर्षात प्रवेश घेतलेबाबत पावती

4) चालू वर्षात शिकत असलेबाबातचे बोनाफाईड सर्टिफिकेट/ओळखपत्र

5) स्वतःचे किव्वा पालकांचे बँक तपशील

6) जातीचा दाखला

 

शिष्यवृत्ती रक्कम: 70,000

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2024.

 

4) SBIF Asha Scholarship Program For IIT STUDENTS:

पात्रता:

1) अर्जदार विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा.

2) अर्जदार विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय यामध्ये पदवीत्तर शिक्षण घेत असावा.

3) विद्यार्थ्याने मागील वर्षांमध्ये कमीत कमी 75 टक्के मार्क मिळवणे गरजेचे आहे.

4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे.( 3 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य)

5) महिला विद्यार्थ्यांना 50 टक्के कोटा राखीव असेल.

6) अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

शिष्यवृत्ती रक्कम: 2 लाखापर्यंत.

 

अंतिम मुदत: 31 ऑक्टोबर 2024.

आवश्यक कागदपत्रे:  वरीप्रमाणे.

अर्ज करण्याची पद्धत: वरीप्रमाणे.


5) SBIF Asha Scholarship Program For IIM Students:

पात्रता: 

1) अर्जदार विद्यार्थ्याने भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीए किंवा पी जी डी एम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

2) सदर विद्यार्थी हा भारताचा रहिवासीय असावा. 'Asha Scholarship Program 2024'

3) विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षांमध्ये 75 टक्के मार्क मिळवणे आवश्यक आहे.

4) कौटुंबिक उत्पन्न सहा लाखाच्या आत मध्ये असावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत मध्ये आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.

5) अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

6) 50 टक्के कोटा महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल.

शिष्यवृत्ती रक्कम: या शिष्यवृत्ती अंतर्गत सर्वात जास्त रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्याला दिली जाते ती रक्कम म्हणजे 7,50,000 इतकी असेल.

 

आवश्यक कागदपत्रे: वरीप्रमाणे.

अर्ज करण्याची पद्धत: वरीलप्रमाणे. "Asha Scholarship Program 2024"

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक: 31 ऑक्टोबर 2024.

 

शिष्वृत्तीसाठी विद्यार्थ्यांची अतीम निवड प्रक्रिया: 

स्टेट बँक फाउंडेशन शिष्यवृत्ती 2024 निवड शैक्षणिक गुणवत्ता तसेच आर्थिक पार्श्वभूमी नुसार केली जाते. यामध्ये जे विद्यार्थी पात्र असतील त्यांची प्राथमिक शॉर्टलिस्ट केली जाते व त्यांचे टेलिफोनिक मुलाखत घेतली जाते व अंतिम निवडीसाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्ती साठी निवड होईल त्यांना आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाईल. ही रक्कम एकदाच असणार आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना


Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.


 नमस्कार मित्रांनो, आज आपण 'Magel Tyala Saur Krushi Pump yojana' मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. नेमकी ही योजना कोणासाठी असणार आहे, यासाठी कोण पात्र असणार आहे तसेच ज्या पात्र शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

 


Magel-tyala-saur-krushi-pump-yojana
Magel tyala saur krushi pump yojana

योजनेची वैशिष्ट्ये:

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना देखील लाभ घेता येतो. यामध्ये सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १०% टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजेच 90% अनुदान भेटणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 5 टक्के हिस्सा फक्त भरायचा आहे म्हणजेच 95 टक्के अनुदान राज्य तसेच केंद्र शासनामार्फत मिळणार आहेत मिळणार आहे.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

यामध्ये जमिनीच्या क्षेत्रानुसार त्या क्षमतेचा सौर पंप मिळणार आहे म्हणजेच ३ एचपी ते ७.५ एचपी इतक्या क्षमतेपर्यंत चा सोलर पंप मिळणार आहे. त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर शेतकऱ्यांना लोड शेडिंग त्याचप्रमाणे वीज बिल भरण्याची चिंता राहणार नाही. ही योजना स्वतंत्र त्याचप्रमाणे शाश्वत गटासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. तसेच ही योजना विम्यासह मिळणार आहे.

 

निकष:

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अडीच एकर पर्यंत जमीन असणार आहे त्या शेतकऱ्यांना तीन एचपी चे सौर कृषी पंप मिळतील त्याचप्रमाणे अडीच एकर ते पाच एकर पर्यंतचे जे शेतकरी असणार आहे या शेतकऱ्यांना पाच एचपी इतक्या क्षमतेचा सौर पंप मिळू शकेल व पाच एकर पेक्षा ज्या शेतकऱ्यांना जास्त जमीन असेल असे शेतकरी साडेसात एचपी इतक्या क्षमतेचे कृषी पंप मिळण्यास पात्र असतील. "Magel Tyala Saur Krushi Pump Yojana"

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर बोरवेल, तलाव किंवा नद्या, नाल्या शेतीच्या जवळ असणे आवश्यक आहे. यासाठी महावितरण सदर शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का याची चौकशी करेल.

ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेतला नाही ते शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

 

सौर कृषी पंपाचे फायदे:

1) सौर कृषी पंपाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्रामीण भागात लोडशेडींग भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला  रात्रीचे  पाणी द्यावे लागते परंतु, सौर पंपामुळे आपल्या सोयीनुसार शेतीला पाणी देता येईल.शेतकऱ्यांना लोड शेडिंग सारख्या गोष्टींचा त्रास होणार नाही.

2) याचा देखभाल खर्च कमी प्रमाणत आहे, डिझेल इंजिन ला लागणाऱ्या इंधनापेक्षा हा पंप परवडतो तसेच अनेक वर्ष टिकतो.

3) कमी दाबाने वीज पुरवठा, मोटर बिघडणे, ट्रान्सफॉर्मर बिघाड अशा त्रासापासून मुक्तता.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

4) राज्यात अनेक ठिकाणी दुर्गम,अतिदुर्गम भाग आहेत की ज्याठिकाणी विजेचे खांब देखील नेणे अवघड असते.अशा ठिकाणी सौर कृषी पंप अत्यंत फायदेशीर ठरतो.

5) पर्यावरणाच्या समतोल योग्य प्रकारे राखला जाऊ शकतो.

 

 ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे मात्र कृषी पंपासाठी वीजपुरवठा उपलब्ध नाही अशा सर्व प्रकारच्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड

2) जातीचा दाखला ( अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी)

3) ७/१२ उतारा ( जलस्त्रोत नोंद आवश्यक)

4) सात बाऱ्यावर इतर हिस्सेदार असतील तर त्यांचे ना हरकत आवश्यक.(stamp पेपर वर)

NOC FORMAT 

5) भूजल सर्वेक्षण विभागाचा ना हरकत दाखला ( डार्क झोन असल्यास) 

6) मोबाईल क्रमांक.

७) पासपोर्ट आकाराचा फोटो.

८) बँक पासबुक. इत्यादि 

 

सदर सौर कृषी पंप नादुरस्त किव्वा काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सी ची 5 वर्ष विनामूल्य असणार आहे.त्यासाठी महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करावा लागणार आहे.

योजेअंतर्गत बसवलेला सौर कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे,त्याची विक्री करणे गुन्हा समजला जाईल व महावितरण मार्फत गुन्हा दाखल केला जाईल.

 

अर्ज करण्याची पद्धत:

सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.त्यासाठी शेतकरी बांधवांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रा मध्ये जावे किव्वा mahadiscom या महावितरण च्या तयार करण्यात आलेल्या नवीन वेबसाईट वर जावे.त्यांनतर A-1 form भरावा व सर्व माहिती वेबसाईट वर व्यवस्थित भरून कागदपत्रे uplod करावीत.

Form submit केल्यानंतर एक लाभार्थी क्रमांक प्राप्त होईल हा क्रमांक जाऊन ठेवावा जेणेकरून वेळोवेळी अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल.

जे शेतकरी पात्र होतील त्यांना 5% किव्वा 10% रक्कम भरावी लागेल त्यांनतर सर्व संच संबंधित शेतकऱ्यास प्राप्त होईल.

bandhkam kamgar yojana 2024: बांधकाम कामगार योजना 2024

 

bandhkam kamgar yojana: योजना एक फायदे अनेक आजच करा अर्ज.

शासनामार्फत अनेक गरजू, विशिष्ठ वर्गांसाठी खूप महत्वपूर्ण तसेच उपयुक्त योजना राबविल्या जातात.याचा अनेक पात्र लाभार्थ्यांना उपयोग होतो देखील मात्र,अनेक जणांना योजनांची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहतात.मात्र त्यांना त्या योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे.
नमस्कार मित्रांनो, amnews मध्ये आपले स्वागत आहे,आज आपण बांधकाम कामगार तसेच त्या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या कामगारांसाठी उपयुक्त असणाऱ्या 'bandhkam kamgar yojana' 
या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

bandhkam-kamgar-yojana-2024
bandhkam kamgar yojana 2024


बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणारे अनेक कामगार काम करत असतात.काही कामगार आपल्या घरापासून दूर काम करण्यासाठी येतात यातील अनेक जण कमी पैशांमध्ये हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत असतात.अनेक कामगार तर विना सेफ्टी किटचे काम करतात त्यामुळे त्यांचे अपघात होतात,काहींना अपंगत्व येत तर काही ठिकाणी मृत्यू देखील होतात त्यामुळे त्यांच्या घरावर उपासमारीची वेळ येते.या सर्व बाबींचा विचार करून 1 मे 2011 रोजी राज्य शासनामार्फत कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.
रस्ते इमारती किंवा मोठमोठे पूल बांधणारे बांधकाम कामगार हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते अनेक अवघड किंवा धोकादायक ठिकाणी काम करत असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली यामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ म्हणजेच MBOCW या संस्थेचे स्थापना 
केली  यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते व त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक त्याच बरोबर आरोग्याविषयी देखील सेवा पुरवल्या जातात.

या योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना:

1) सामाजिक सुरक्षा योजना:
बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचबरोबर त्याच्या मुलीच्या विवाह साठी देखील अर्थसाह्य दिले जाते.


प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या अंतर्गत शासनाचे विविध लाभ दिले जातात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा लाभ देखील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिला जातो. "
bandhkam kamgar yojana" 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याचबरोबर अटल पेन्शन योजना या दोन्ही योजनेचा लाभ देखील या योजनेअंतर्गत घेतला जाऊ शकतो.


कौशल्य वृद्धी योजना.


घरकुल योजना.


स्मार्ट कार्ड.


2)शैक्षणिक योजना:
*बांधकाम कामगाराच्या पहिली ते सातवीच्या मुलांना प्रतिवर्षी अडीच हजार रुपयांचे सहाय्य केले जाते. form link 


*आठवी ते दहावीच्या मुलांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. 
इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त झाले असल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळू शकते.form link 


*अकरावी व बारावीच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
मुलांना तसेच कामगाराच्या पत्नीस पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्यास त्यासाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपयांचे अनुदान व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे अनुदान देखीलदिले जाते. form link


*अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी साठ हजार रुपये.


*नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन मुलांस एम एस सी आय टी शिक्षणासाठी पूर्ण शुल्क दिले जाते. form link


*आयटीआय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू होते.


*बांधकाम कामगारांच्या मुलासाठी पीएचडी त्यासोबत परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.


*शैक्षणिक पुस्तके भेट दिली जातात.


3) आरोग्य योजना:
*बांधकाम कामगाराच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी 15000 रुपयांचे सहाय्य दिले जाते त्यासोबत सिजेरियन प्रसूतीसाठी वीस हजार रुपयांचे सहाय्य दिले जाते. form link


*बांधकाम कामगाराच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य सोबत बांधकाम कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजारासाठी एक लाखांचे आर्थिक सहाय्य देखील दिले जाते.


*जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख रुपयांचे मुदत ठेव बंद दिली जाते.form link


*बांधकाम कामगार काम करत असताना काही अपघात झाल्यात त्याला 75 टक्के किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये दोन लाखाची मदत दिली जाते.


*बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत व्यक्तीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील घेता येतो.form link


*बांधकाम कामगार दवाखान्यात भरती असेपर्यंत त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्यक दिले जाते.


*नोंदणीकृत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी देखील केली जाते.


4) आर्थिक सहाय्य:
*बांधकाम कामगारांना काम करण्यासाठी आवश्यक असणारे अवजारे खरेदी करण्यासाठी तीन वर्षातून एकदा पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते या पैशातून बांधकाम कामगारांना बांधकाम क्षेत्रात जी आवश्यक अवजारे आहेत ती खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. 


*जर एखाद्या कामगाराचा काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. form link


*बांधकाम कामगार पेटी योजना यामार्फत आवश्यक असणारे सर्व टूल किट एका पेटीमध्ये बांधकाम कामगाराला त्याच्या घरी पोच केले जाते.


*बांधकाम कामगार इतर नैसर्गिक कारणांनी मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना दोन लाखाचे आर्थिक अनुदान दिले जाते. 
bandhkam kamgar yojana 

form link 

*अटल बांधकाम कामगार योजना शहरी तसेच ग्रामीण अंतर्गत दोन लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते.


*एखाद्या 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी दहा हजारांचे सहाय्य केले जाते.


*एखाद्या पुरुष कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या पतीस पाच वर्षांसाठी 24 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.


*घर खरेदीसाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी देखील त्यांना अनुदान दिले जाते.
बांधकाम कामगाराच्या कुटुंबासाठी गृहपयोगी वस्तूंचे वितरण केले जाते.
वाहन चालक प्रशिक्षण देखील दिले जाते.


 अटी:
"बांधकाम कामगार नोंदणी" या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
मागील वर्षामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून त्या व्यक्तीने काम केलेले असावे.
ऑनलाईन पोर्टल वर नोंदनी आवश्यक.
नोंदणी करणाऱ्या कामगाराचे वय 18 ते 60 यामध्ये असावे.


 आवश्यक कागदपत्रे:
1) नमुना नं. 5 Form
Form download करण्यासाठी येथे क्लिक करा.

2) रहिवासी पुरावा:
आधार कार्ड/वीज बिल/ग्रामपंचायत रहिवासी दाखला यापैकी एक.

3) ओळखपत्र पुरावा: आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक.

4) पासपोर्ट साइज फोटो

5) वयाचा पुरावा:
जन्म दाखला/शाळा सोडलेला दाखला.

6) 90 दिवस काम केल्याबाबत प्रमाणपत्र: bandhkam kamgar yojana 

ग्रामपंचायत क्षेत्र असेल तर ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात असल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्याचा 90 दिवस काम केल्याचा दाखला किंवा कामगार ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणचा ठेकेदाराकडून मागील वर्षात 90 दिवस काम केले बाबतचा दाखला यापैकी एक दाखला आवश्यक असणारं आहे.

7) बँक पासबुक

8) मोबाईल क्रमांक

9) ईमेल आयडी

10) घोषणापत्र.


 अर्ज करण्याची पद्धत:
बांधकाम कामगार कल्याण योजनेअतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज भरून सर्व कागदपत्रे जोडून ती बांधकाम कार्यालयात जमा करावीत किव्वा online form भरण्यासाठी  mahabocw  
या वेसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.
आपण भरलेल्या फॉर्म चे verification होऊन जर आपले सर्व कागदपत्रे खरी असतील तर आपण सदर योजनेच्या सर्व लभांचा फायदा घेऊ शकतो.

lek ladki yojana : लेक लाडकी योजना नवीन स्वरुपात राज्यात पुन्हा सुरु


lek ladki yojana



महाराष्ट्र शासनाने lek ladki yojana 2023  राज्यात नव्याने  सुरू केली आहे जी पात्र मुलींना आर्थिक लाभ देण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. नोंदणी केलेल्या पात्र मुलींना 101000 ची रक्कम ठराविक कालावधी नंतर मिळू शकते.या महत्वाच्या योजनेविषयी आपण आपल्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.

lek ladaki yojana
LEK LADKI YOJANA 



लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र


लेक लाडकी योजना हि मुलींना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देण्यासाठी चा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील असलेल्या विद्यार्थिनींना मदत करण्यासाठी स्थापन केला होता. लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत मुली चा जन्म झाल्यापासून त्या 18 वर्षे पूर्ण करतील तेव्हा त्यांना एकूण 101000 रुपये मिळतील. Lek Ladki Yojana
लाभार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यातील पिवळे किव्वा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना या च योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेचच 5000 रुपये दिले जातील,मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर रुपये 4000 मिळतील,इयत्ता सहावी मध्ये रुपये 6000 मिळतील व मुलगी इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर त्या मुलीस रुपये 8000 मिळतील आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यात त्या मुलीस रुपये 75,000 मिळेल असे या योजनेचे थोडक्यात स्वरूप आहे.



महाराष्ट्र लेक लाडकी योजना : 2023-24 lek ladki yojana marathi

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्याला एकूण रु. 101000 मिळणार आहे ज्याचा वापर मुलींच्या विविध आर्थिक खर्चासाठी करू शकते. या योजनेचा मुख्य हेतू मुलींना त्यांच्या शिक्षण ,आरोग्यासोबत आर्थिक मदत करणे हा आहे.  लेक लाडकी योजना राज्यात महाराष्ट्र शासनाअंतर्गत यापूर्वी देखील सुरु होती मात्र त्यातील काही त्रुटी दूर करून आता लेक लाडकी 2.0 सुरु करण्यात आली आहे त्यास एप्रिल २०२३ मध्ये मान्यता मिळाली आहे. Lek Ladki Yojana Maharashtra 2023

योजनेचा उद्देश - लाभार्थ्यांना आर्थिक मदत
योजनेचे उद्दिष्ट - 1 लाख रु
जे कुटुंब कमी उत्पन्न गटामध्ये असेल त्यांना आर्थिक मदत मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे.


लेक लाडकी योजना आर्थिक मदत:
या योजनेचा मुख्य हेतू पात्र कुटुंबांना त्यांच्या मुलीला आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे. या कार्यक्रमाची उद्दिष्टे मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणे आणि बालविवाह आणि कुपोषण समाप्त करणे हा आहे.
योजनेंतर्गत मुलीला जन्मापासूनच आर्थिक मदत मिळण्याची याची खात्री करणे तसेच ही योजना स्त्री भ्रूणहत्या कमी होण्यासही हातभार लावेल. Lek ladki yojana 
योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेचच 5000 रुपये दिले जातील,मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर रुपये 4000 मिळतील,इयत्ता सहावी मध्ये रुपये 6000 मिळतील व मुलगी इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर त्या मुलीस रुपये 8000 मिळतील आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मुलीचे वय १८ झालेनंतर त्या मुलीस रुपये 75,000 मिळेल  असे एकूण 1,01000 इतके रुपये मिळतील.


महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता निकष 2023:

लेक लाडकी योजना राज्य सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पा मध्ये सादर केली. या योजनेचा फायदा राज्यातील अल्प उत्त्पन्न असलेल्या मुलींना होईल. आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या घरात जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे. त्यातून मुलींचे शैक्षणिक जीवन सुकर होईल. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवा दृष्टिकोन घेत आहे. 'Lek Ladki Yojana'
अर्ज करनारा उमेदवार हा कायमस्वरूपी महाराष्ट्रात राज्यातील रहिवासी असावा.
उमेदवार हि मुलगी असणे आवश्यक आहे.
सदर मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा.
ज्याना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे.
• पहिल्या अपत्यासाठी तिसर्या हप्त्यासाठी किव्वा दुसर्या अपत्याच्या दुसर्या हप्त्यासाठी मुलीच्या माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

                   
👉शासन निर्णय पहा 👈


महाराष्ट्र लेक लाडकी अर्ज 2023-24 आवश्यक कागदपत्रे

ज्यांना लेक लाडकी योजना 2023 साठी अर्ज सादर करायचे आहेत त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की त्यांना अर्ज प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे सरकारी मान्यताप्राप्त आणि प्रमाणित असावीत.

जन्म नोंदणी
• आईचे 
आधार कार्ड
• मुलीचे आधार कार्ड (पहिल्या लाभावेळी अट शिथिल)
• आई वडिलांसोबत मुलीचा फोटो.
• पालकांचे 
निवडणूक ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( 1 लाखाच्या आतील )
• रेशन कार्ड
• बँक पासबुक 
• मुलीचे वय १८ झालेनंतर मतदान यादीत नाव असणे आवश्यक.
• अंतिम लाभवेळी मुलीचे लग्न झालेले नसणे आवश्यक.


महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्य आणि फायदे:
• मुलींच्या पालकांना आर्थिक अडचण दूर होण्यास मदत.
लेक लाडकी महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी सुरू केली होती.
मुलीच्या जन्मापासून ते मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला शिक्षणासाठी सरकार लेक लाडकी योजनेद्वारे आर्थिक सहाय्य पुरवेल. "Lek Ladki Yojana"
योजनेच्या लाभांचा लाभ घेऊन मुलगी तिचे सर्व शिक्षण पूर्ण करू शकेल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या कुटुंबातील मुलींना लाभ.



महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी नोंदणी करण्याचे टप्पे:
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील सूचनांचे पालन करावे लागेल. 
अर्ज प्रक्रिया हि आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करावी लागणार आहे.
                         lek ladki yojana form 
                      👉अर्ज डाउनलोड करा 👈

वरील अर्ज आपण प्रिंट करू शकता किव्वा अंगणवाडी मध्ये देखील उपलब्ध असेल हा अर्ज व्यवस्थित भरून अंगणवाडी सेविका यांचेकडे देऊन त्या सर्व माहिती देतील.


pwd recruitment 2023: सार्वजनिक बांधकाम विभागात होत आहे मोठी भरती.


PWD RECRUITMENT 2023

 नमस्कार मित्रांनो,आपण आपल्या लेखांमध्ये सरकारी नोकर भरती विषयी माहिती पाहत असतो.आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत राबविल्या जाणाऱ्या PWD RECRUITMENT 2023 या भरती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

pwd recruitment 2023
pwd recruitment 2023



pwd recruitment:

मित्रांनो, राज्य शासनाच्या public work department अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागा ग्रुप B व ग्रुप C अंतर्गत मोठी भरती होणार असून या भरतीमध्ये विविध पदांसाठी तब्बल 2109 रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे.यामधे शिपाई,वरिष्ठ लिपिक,वाहन चालक,प्रयोगशाळा सहाय्यक,लघुलेखक, तसेच कनिष्ठ अभियंता व इतर असे एकूण 14 प्रवर्गासाठी ची भरती होणार आहे.याबाबत शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे,त्यामुळे जे उमेदवार इच्छूक तसेच पात्र असतील त्यांनी भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत.


पदांची विभागणी:

1) शिपाई - 41 जागा.

2) स्वच्छक - 32 जागा.

3) वाहन चालक - 2 जागा.

4) प्रयोगशाळा सहाय्यक - 5 जागा.

5) स्वच्छता निरीक्षक - 1 जागा.

6) वरिष्ठ लिपिक - 27 जागा.

7) उद्यान पर्यवेक्षक - 12 जागा.

8) सहाय्यक वास्तुशास्त्र - 9 जागा.

9) लघुलेखक ( निम्नश्रेणी) - 2 जागा.

10) लघुलेखक ( उच्च श्रेणी) - 8 जागा.

11) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) - 532 जागा.

12) कनिष्ठ अभियंता ( विद्युत) - 55 जागा.

13) कनिष्ठ वास्तूशात्र - 5 जागा.

14) स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक - 1387 जागा.

एकूण जागा - 2109.


शैक्षणिक पात्रता

1) शिपाई (ग्रूप C): 10 वी.


2) स्वच्छक (ग्रुप C): 10 वी.


3) चालक (ग्रुप C): 10 वी.


4) प्रयोगशाळा सहाय्यक (ग्रुप C ): रसायनशास्त्रातील मुख्य विषयासह विज्ञानातील शाखेतून पदवी.


5) स्वच्छता निरीक्षक (ग्रूप C ): 10 वी (मॅट्रिक्युलेशन).

 Pwd recruitment 2023

6) वरिष्ठ टायपिस्ट (ग्रूप C ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 


7) उद्यान निरीक्षक (ग्रूप C ): कृषी किंवा फलोत्पादनातील पदवी.


8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुविशारद (ग्रुप C ): आर्किटेक्चरमधील पदवी.


9) लघुलेखक (उच्च श्रेणी) (ग्रूप B नॉन-राजपत्रित): 10 वी आणि किमान टायपिंगचा स्पीड इंग्रजीमध्ये 120 WPM किंवा इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 40 WPM किंवा मराठी शॉर्टहँडमध्ये 30 WPM


10) लघुलेखक (नीन्म श्रेणी) (ग्रूप B )नॉन-राजपत्रित): 10 वी आणि टायपिंगचा इंग्रजी साठी 100 WPM किंवा इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 40.


11) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रूप B अराजपत्रित): 3-वर्षाचा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष.


12) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (ग्रुप B अराजपत्रित): इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा समकक्ष.


13) कनिष्ठ वास्तुविशारद (ग्रुप B अराजपत्रित): वास्तुशास्त्रातील पदवी असावी.


14) असिस्टंट आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (ग्रूप C): आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा.


वयोमर्यादा:

PWD मधे अर्ज करणेसाठी ग्रुप B किव्वा ग्रुप C साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 40 दरम्यान असावे.तसेच मागासवर्गीय,अनाथ किव्वा आर्थिक दुर्बल घटकांसाठी वयाच्या अटेमध्ये 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.  Pwd recruitment 2023


अर्ज शुल्क: 

अर्जदारांच्या श्रेणीनुसार अर्जाची फी बदलते. खुल्या प्रवर्गांतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी 1000 इतके शुल्क आहे, तर राखीव प्रवर्गातील, ज्यामध्ये मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचा समावेश आहे अशा उमेदवारांना फी 900 रुपये इतकी आहे.


अर्ज पद्धत: pwd recruitment 2023 apply online

* सार्वजनिक बांधकाम विभागा मध्ये अर्ज करण्याची पध्दत आँनलाईन स्वरूपाची आहे.पात्र उमेदवारास अर्ज करण्यासाठी mahapwd.com या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.


* "PWD महाराष्ट्र 2023" अंतर्गत गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी "apply online" वर क्लिक करा.

 "Pwd recruitment 2023"

* तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरणे आवश्यक आहे जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क माहिती.


* आता तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती द्यावी लागेल, जसे की शाळेचे/कॉलेजचे नाव, उत्तीर्ण होण्याचे वर्ष.


* तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती, छायाचित्र आणि स्वाक्षरीसह अपलोड करण्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करा.


* शेवटी अर्ज शुल्क भरावे लागेल आणि ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या भरतीसाठी अर्ज submit करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 असणार आहे.

सदर माहिती आपणास आवडली असेल तर ती इतरांसोबत देखील शेअर करावी.